Uddhav Thackeray  
महाराष्ट्र

Uddhav Thackeray : निकष बाजूला ठेवा, लाडक्या बहिणींना तात्काळ २१०० रूपये द्या - ठाकरेंची मागणी

Uddhav Thackeray Press Conference : लाडकी बहीण योजनेचे निकष न पाहाता सरसकट २१०० रूपये देण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारकडे केली आहे. नागपूरमध्ये ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

Uddhav Thackeray on Ladki Bahin Yojana : आवडती-नावडती बहीण असं करू नका, निकष बाजूला ठेवा. निकष न पाहाता लाडक्या बहि‍णींना तात्काळ २१०० रूपये द्या, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारकडे केली आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते. यावेळी ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. त्याशिवाय भरत गोगावले यांच्या मंत्रि‍पदावरून फिरकीही घेतली. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमिवर उद्धव ठाकरे आज नागपूरमध्ये आले आहेत. ईव्हीएमवरूनही ठाकरेंनी घणाघाती टीका केली.

लाडक्या बहीण योजनेचे पैसे देताना आवडती, नावडती करू नका. निकष न पाहता सरसकट २१०० रूपये जमा करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारकडे केली. नाराज सुधारले तर बघूयात. २०१९ चा अनुभव माझा गुरू आहे, असे म्हणत ठाकरेंनी बंडखोर नेत्यांबाबत मवाळ भूमिका घेतली. नाराजांना आता आमची भूमिका पटतेय, असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आमचे २० आमदार पुरेशे आहेत, असा टोला उद्धव ठाकरेंनी विरोधकांच्या संख्याबळावरून लगावला. विस्तार झाला मात्र अजून खातेवाटप झाले नाही. बिन खात्याच्या मंत्र्यांवर काय जबाबदारी आहे. गंमत म्हमून अधिवेशन असल्यास लोकशाहीची थट्टा आहे, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय.

घट्ट झालेले जॅकेट काहींच्या अंगावर चढलं, भरत गोगावले यांना मंत्रिपद मिळाल्यावरून उद्धव ठाकरेंनी बोचरी टीका केली. छगन भुजबळ यांच्याबाबत फार वाईट वाटतेय, असेही ठाकरे म्हणाले.

EVM सरकार, ठाकरेंची खोचक टीका

विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरमधे सुरु झालेलं आहे. आधी अडीच वर्ष घटनाबाह्य सरकार होतं. नुकत्याच निवडणुका पार पडल्या. नवीन सरकार महाराष्ट्रात आलेय. आता जो निकाल लागला, तो अनाकलनीय अनपेक्षित असा आहे. जनता या सरकारला EVM सरकार म्हणत आहे. या EVM सरकारच हे पहिलं अधिवेशन आहे, अशी खोचक टीका उद्धव ठाकरेंनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी

Ganpati Visarjan : पुण्यात गणपती विसर्जनावेळी दुर्घटना, मिरवणुकीदरम्यान दोन जणांना विजेचा शॉक

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

'दम मारो दम' राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता नशा करण्यात दंग, 'तो' व्हिडिओ व्हायरल

Aayush Komkar: क्लासवरून घरी येत होता, बेसमेंटमध्ये दोघांकडून अंदाधुंद गोळीबार; आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT