LADKI BAHIN YOJANA PAYMENT DELAY | WOMEN PROTEST OVER PENDING INSTALLMENTS saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: रखडलेल्या हप्त्यासाठी महिलांचा राडा; लाडकींचे पैसे नेमके गेले कुठे?

Ladki Bahin Scheme Controversy: महायुतीला सत्तेत बसवणाऱ्य लाडक्या बहीणी आता सरकारविरोधात आक्रमक झाल्या आहेत. त्याचं नेमकं कारण काय? कोणत्या कारणासाठी लाडक्या बहीणींनी राडा केलाय. पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Suprim Maskar

  • लाडकी बहीण योजनेचा हप्ता वेळेवर न मिळाल्याने महिलांचा संताप

  • जळगावात बालविकास कार्यालयात महिलांचे आंदोलन

  • राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना जळगावात वादाच्या भोवऱ्यात का अडकली

एकदा, दोनदा नाही, तर वारंवार सरकारी कार्यलयाच्या चकरा मारूनही खात्यात पैसे येत नसल्याने जळगावात लाडक्या बहिणींचा संयम सुटला. आणि थेट बालविकास कल्याण केंद्रात धडक मारली. आमचे पैसे कुठे गेले?" असा जाब विचारत लाडकींनी सरकारी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं.

राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना जळगावात वादाच्या भोवऱ्यात का अडकली.पाहूयात. जळगाव जिल्ह्यात एकूण 10 लाखाहून अधिक महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेत. मात्र KYC केल्यानंतर 1 लाखाहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा न झाल्यानं महिलांचा उद्रेक झालाय. दुसरीकडे ई-केवायसीत झालेल्या चुकांमुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात येणारे पैसे थांबल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलयं.

बोगस लाडकींमुळे सरकारी तिजोरीवर ताण येत असल्यानं शासनानं योजनेतील लाभार्थ्यांची काटेकोर छाननी सुरु केली. ई-केवायसी बंधनकारक करून बोगस लाडकींची नावे योजनेतून वगळण्यात आली.. अशातच वर्षभरात राज्य सरकारचे तब्बल 165 कोटी रुपये अपात्र लाभार्थ्यांनी लुटल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली होती. अशात लाडकीचा लाभ बंद झाल्यावर जळगावात महिला आक्रमक झाल्यानं ई- केवायसी प्रक्रिया जलद आणि अचुक पद्धतीनं राबवण्याचं आव्हान शासनापुढे उभं राहिलयं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एका सेल्फीवर EPF चं खातं उघडता येणार; जाणून घ्या प्रोसेस स्टेप बाय स्टेप

Russia vs Ukraine war : रशिया-युक्रेन युद्ध पुन्हा पेटलं; युक्रेनचे लष्करी तळ उद्धवस्त, VIDEO

भाजप मंत्र्याच्या मुलाचा माज, कारने अनेकांना उडवलं; नंतर जमलेल्या स्थानिक लोकांवर पिस्तुल ताणली

Iran vs US Tensions: खामेनेईंच्या टार्गेटवर सुन्नी देश, इराणचे खतरनाक चार प्लॅन

Crime News: दिप्तीनंतर आता कीर्ती! बाथरुममध्ये कोंडलं, बेदम मारलं; १०लाखांसाठी अमानुष छळ; आणखी एका विवाहितेनं संपवलं आयुष्य

SCROLL FOR NEXT