Ladki Bahin Yojana Saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार?; फडणवीस सरकारमधील मंत्र्यांनी दिली नवी अपडेट

Mahavikas Aghadi Spreading False Information about Ladki Bahin Scheme: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या २१०० रूपयांच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठं विधान केलं आहे.

Bhagyashree Kamble

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गदारोळ सुरू आहे. लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात १५०० रूपये जमा होतात. पण अद्याप महायुतीने दिलेल्या आश्वसनाप्रमाणे २१०० रूपये महिलांना मिळालेले नाहीत. दरम्यान, २१०० रूपये महिलांना कधी मिळणार? याकडे महिला आस लावून बसले आहेत. २१०० रूपयांच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठं विधान केलं आहे. लाडकी बहीण योजनेचे २१०० रूपये वेळेवर दिले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

२१०० रूपये वेळेवर दिले जातील

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी लाडकी बहीण योजनेच्या २१०० रूपयांच्या मुद्यावर भाष्य करताना म्हणाले की, 'लाडकी बहीण योजनेचे २१०० रूपये वेळेवर दिले जातील. जर ही रक्कम वेळेवर दिले गेली नाही तर, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत मत याची आम्हाला जाणीव आहे, असं हसन मुश्रीफ एका सभेत म्हणालेत.

सध्या काही लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेचे १५०० नसून फक्त ५०० रूपये देण्यात येईल, असं सांगण्यात येत आहे. ज्या महिला नमो सन्मान योजनेचा लाभ घेतात, त्या लाडकी बहिणीच्या बँक खात्यात १५०० नसून ५०० रूपये जमा होतील, अशी माहिती समोर आली आहे. ही माहिती खोटी असून, प्रत्येक लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात १५०० रूपये जमा होतील, असं हसन मुश्रीफ यांनी ठामपणे सांगितलं आहे.

तसेच कोणत्याही महिलेला योजनेतून पैसे कमी मिळणार नाहीत, अशी हमीही हसन मुश्रीफ यांनी भरसभेत दिली. यावेळी महाविकास आघाडीवर त्यांनी आरोप केला आहे. महाविकास आघाडी आणि इतर विरोधकांकडून चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Earthquake : मणिपूरला भूकंपाचे हादरे! ५.२ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Gold Rate Today: खुशखबर! चांदी ₹१०,०००नी स्वस्त ! सोन्याचे दर किती? वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

Periods Mental Health : पीरियड्समध्ये न चुकता करा 'ही' कामे, चिडचिड अन् मूड स्विंग्स होणारच नाही

Who Is Rajnandini Pawar: महाराष्ट्राची कन्या देशात ठरली सर्वात सुंदर! कोण आहे राजनंदिनी पवार? 'मिस इंडिया 2026' ची उपविजेती

Bhendwal Bhavishyvani: यावर्षी पाऊस कसा राहिल? शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा; देशावर आर्थिक संकट, वाचा भेंडवळच्या घटमांडणीचा A टू Z अंदाज

SCROLL FOR NEXT