Ladki Bahin beneficiaries to get 5 litres free petrol in Solapur 
महाराष्ट्र

Free Petrol: लाडक्या बहिणींना मोफत मिळणार ५ लिटर पेट्रोल; कोणी केली घोषणा?

Free Petrol Scheme Ladki Bahin Yojana: सोलापूर शहरातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ५ लिटर मोफत पेट्रोल देण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही घोषणा कोणी आणि कोणत्या कारणासाठी केली, जाणून घ्या.

Bharat Jadhav

  • लाडकी बहीण योजनेच्या महिलांना ५ लिटर मोफत पेट्रोल

  • सोलापूरमधील महिलांना ५ लिटर मोफत पेट्रोल कोण देणार

  • लाडकी बहीण लाभार्थींना मोफत पेट्रोलची घोषणा

तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेताय? शासनाच्या या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. महिलांना मोफत पेट्रोल दिलं जाणार असल्याची घोषणा करण्यात आलीय. मात्र मोफत पेट्रोलचा लाभ फक्त सोलापूर शहरातील महिलांना मिळणार आहे. महिलांना मोफत पेट्रोल देण्याची कोणी आणि का केली हे जाणून घेऊ.

महिलांना मोफत पेट्रोल देण्याची घोषणा एमआयएम पक्षाच्या नेत्यानं केलीय. आपल्या नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्त कार्यकर्ते विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. एमआयएमच्या पक्षातील कार्यकर्त्यांनीही असाच एका सामाजिक उपक्रम सुरू केला आहे. त्याच उपक्रमातून महिलांना मोफत पेट्रोल दिले जाणार आहे.

एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या वाढदिवसा निमित्ताने सोलापूर जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी मोफत पेट्रोल देण्याची घोषणा केलीय. दरवर्षी10 ऑगस्ट रोजी शौकत पठाण हा उपक्रम राबवतात. सोलापुरात ज्यांचं नाव इम्तियाज आहे, त्यांना 5 लिटर मोफत पेट्रोल दिले जात आहे. म्तियाज नावाच्या व्यक्तींनी आज सकाळपासून सोलापुरातील सात रस्ता परिसरातील पेट्रोल पंपावर मोठी गर्दी केली होती. आधार कार्ड हातात घेऊन अनेक इम्तियाज नावाचे नागरिक पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर आले होते.

इम्तियाज नावाच्या व्यक्तींप्रमाणे शहरातील लाडक्या बहिणींना देखील ५ लिटर मोफत दिले जात आहे. राज्यात लाडकी बहिण योजना भरपूर चर्चेत आहे,त्यामुळे पठाण यांनी लाडक्या बहिणींचा देखील त्यांचा सत्कार करून, त्यांना देखील 5 पेट्रोल मोफत दिले जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३ लाख ५१ हजार शेतकरी पात्र, कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

Tuesday horoscope: या ४ राशींच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस महत्त्वाचा; नोकरी आणि पैशांच्या बाबतीत काय घडणार?

SCROLL FOR NEXT