Ladki Bahin Yojana Saam TV
महाराष्ट्र

Ladaki Bahin Yojana : राज्यातील उत्तर भारतीयांनाही मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; शिवसेनेचं मुंबईत मोठं अभियान

Ladaki Bahin Yojana For Uttar Bhartiya : मुख्यमंत्री लाडकी बहीण जोजनेचा लाभ आता उत्तर भारतीयांनाही मिळवून देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून योजना नोंदणीसाठी २ ऑगस्ट पासून सायंकाळी मालाड पश्चिम येथून उत्तर भारतीय संवाद सभा करण्यात येणार आहे.

Sandeep Gawade

मुख्यमंत्री लाडकी बहीण जोजनेचा लाभ आता उत्तर भारतीयांनाही मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने योजना नोंदणीसाठी उत्तर भारतीय संवाद सभा सुरू केली आहे. माजी खासदार आणि शिवसेना प्रवक्ता संजय निरुपम यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. उत्तर भारतीय पॉकेट्स असलेल्या ४० उत्तर भारतीय संवाद सभांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे. भियानाची सुरुवात शुक्रवार, २ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी मालाड पश्चिम येथून करण्यात येणार

पहिल्या टप्प्यात 18 ठिकाणी उत्तर भारतीय संवाद सभा अभियान राबविण्यात येणार आहे. उत्तर भारतीय महिलांना या योजनेत जोडण्याकरिता शिवसेनेचा प्रयत्न आहे. मुंबई आणि मुंबई मेट्रो परिसरातील नालासोपारा, बोरीवली, दहिसर, कांदिवली, मालाड, गोरेगाव, दिंडोशी, जोगेश्वरी, अंधेरी, कालिना, चांदिवली, चेंबूर, घाटकोपर, माहीम आणि वरळी येथेही उत्तर भारतीय संवाद सभा अभियान राबविण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अमेरिकेचा इराणवरील हल्ल्याचा सिक्रेट प्लॅन? अमेरिका-इराणमध्ये महायुद्ध पेटणार?

काँग्रेस-MIMच्या नगरसेवकांमध्ये राडा, अकोल्यात भाजपचाच महापौर

विमान अपघातातील वैमानिकाचा फोटो व्हायरल, कॅ. सुमीत कपूर यांचा फोटो असल्याचा दावा

आयकर विभागने छापा टाकला; प्रसिद्ध उद्योजकाने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?

अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी एकत्र येणार? राज्यात चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT