Bone-chilling cold predicted in India as La Niña strengthens – IMD warns of extreme winter 2025-26 Saam TV Marathi News
महाराष्ट्र

Maharashtra winter : गरम कपडे तयार ठेवा! यंदा महाराष्ट्रात हाडं गोठवणारी थंडी, तज्ज्ञांनी सांगितलं कारण, वाचा सविस्तर

Cold Weather Forecast : भारतात यंदा हाडं गोठवणारी थंडी पडणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज. ला-नीना (La Niña) मुळे तापमानात मोठी घट होऊन हिवाळा दरवर्षीपेक्षा अधिक थंड राहणार आहे, असा भारतीय हवामान विभागाचा इशारा.

Namdeo Kumbhar

  • भारतात यंदा नेहमीपेक्षा जास्त थंडी पडणार.

  • ला-नीना हवामान प्रक्रियेमुळे तापमानात मोठी घट.

  • ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान ला-नीना ७१% सक्रिय राहण्याची शक्यता.

  • डिसेंबर ते फेब्रुवारीमध्ये थंडी कायम राहील, मात्र प्रभाव कमी होऊ शकतो.

  • तज्ज्ञांचा इशारा – हाडं गोठवणारी थंडी पडणार आहे.

IMD forecast How La Niña impacts Indian winters : क्लायमेट बदलामुळे देशातील वातावरणात मोठा बदल झालाय. प्रत्येकवर्षी तापमानात कमालीची घट होत आहे. देशभरात पावसाचा प्रकोप मोठ्या प्रमाणात वाढलाय, त्यामुळे पूर, भूस्खलन आणि मालमत्तेचे नुकसान यासारख्या घटना घडल्या आहेत. महाराष्ट्रापासून ते उत्तराखंड अन् जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पावसाने हाहाकार माजवला. पावसामुळे देशभरात अनेक ठिकाणी जनजिवन विस्कळीत झाले आहेच. लवकरच हिवाळ्याला सुरूवात होणार आहे. पण यंदाचा हिवाळा जास्त मारक असेल. कारण यंदा La Niña मुळे हाडं गोठवणारी थंडी पडण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

वेदर एक्‍सपर्टने हिवाळ्याबाबत आताच अलर्ट जारी केला आहे. तज्ज्ञांच्या मते, यंदा हाडं गोठवणारी कडाक्याची थंडी पडू शकते. ला-नीना कार्यकरत झाल्यामुळे तापमानात मोठी घट होऊ शकते. ऑक्टोबर ते डिसेंबर यादरम्यान  ला-नीना (La Niña) ७१ टक्क्यांपर्यंत अॅक्टिव्ह राहण्याची शक्यता आहे. डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ यादरम्यान La Niña चा प्रभाव कमी होऊन ५४ टक्क्यांपर्यंत राहू शकतो. त्यामुळे हवामानात नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात गारवा वाढणार आहे. भारतामध्ये दरवर्षीपेक्षा जास्त थंडी राहू शकते. जागतिक हवामन तज्ज्ञांकडूनही याबाबतचा इशारा देण्यात आला आहे. जगातील हवामान पॅटर्न बदलला असून भारतात दरवर्षीपेक्षा जास्त थंडी पडू शकते, असे त्यांनी म्हटलेय.

ला-नीना म्हणजे काय?

ला-नीना ही एक हवामान प्रक्रिया आहे. पॅसिफिक महासागरातील समुद्राच्या तापमानाशी संबंधित आहे. ही एल-निनो-सदर्न ऑसिलेशन (ENSO) चक्राचाच एक भाग आहे. ला-नीनामुळे पूर्व पॅसिफिक महासागरातील समुद्राचे पाणी सामान्यपेक्षा थंड होते. यामुळे जागतिक हवामानावर परिणाम होतो. ला-नीनाचा प्रभाव फक्त प्रशांत महासागरापर्यंतच मर्यादीत नाही, तर जगभरात आहे.

भारतावर किती प्रभाव पडणार?

ला-नीनाचा परिणाम फक्त पॅसिफिक महासागरापुरताच मर्यादित नाही, तर संपूर्ण जगाच्या हवामानावर होतो. भारतात ला-नीना फक्त हिवाळ्यामध्ये तापमान अधिक कमी करतो, त्यामुळे सामान्यपेक्षा थंडी जास्त जाणवते. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, ‘आमचे मॉडेल ऑक्टोबर-डिसेंबर दरम्यान ला-नीना विकसित होण्याची ५०% पेक्षा जास्त शक्यता दाखवत आहे. हवामान बदलामुळे भारतात तापमान आणखी थंडी होऊ शकते. त्यामुळे दरवर्षीपेक्षा यंदा हिवाळा अधिक थंड राहण्याची शक्यता आहे.

...तरच ला नीनाचा प्रभाव

यंदा कमी कालावधीपुरता ला-नीनाचा प्रभाव पडण्याची शक्यता असल्याचे स्कायमेट वेदरचे अध्यक्ष जी. पी. शर्मा यांनी सांगितले. ते म्हणाले की, पॅसिफिक महासागरातील समुद्राचे पाणी आधीपासूनच सामान्यपेक्षा थंड आहे. पण अद्याप ला-नीना पातळीपर्यंत पोहोचलेले नाही. जर समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान -0.5 अंश सेल्सिअसपेक्षा खाली गेले आणि ही स्थिती सलग तीन महिने राहिली, तरच त्याला अधिकृतपणे ला-नीना घोषित केले जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बाहेर कॉम्प्यूटर सेंटरचं पोस्टर, आत वेश्याव्यवसाय; पोलिसांनी तरूणींना रंगेहाथ पकडलं

Curd Water : दह्याला सुटलेले पाणी प्यावे की टाकून द्यावे? वाचा तज्ज्ञांचे मत

Weekly Horoscope : मिथुन, मीनसह ७ राशींना पूर्वजांचा आशीर्वाद; खुलणार करिअरचे दरवाजे; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Dark Chocolate Cake: वजन आणि हृदयासाठी फायदेशीर डार्क चॉकलेट केक, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

India Tourism: खंडाळ्याला हमखास विसराल! वसईपासून ५ तासांच्या अंतरावर आहे 'हे' सुंदर पर्यटन स्थळ

SCROLL FOR NEXT