gadchiroli saam tv
महाराष्ट्र

Kunbi Samaj Morcha : मराठ्यांचा कुणबीत समावेश नकाे ! जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला महामाेर्चा

या माेर्चात शेकडाे कुणबी समाजबांधव सहभागी झाले हाेते.

Siddharth Latkar

 मंगशे भांडेकर

Gadchiroli News : गडचिरोलीत हजारो कुणबी बांधवांनी आज (गुरुवार) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक माेर्चा काढला. या माेर्चेक-यांनी मराठ्यांना कुणबी जातीत सहभागी न करण्याची प्रमुख मागणी केली आहे. (Latest Marathi News)

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या शासनस्तरावर हालचाली सुरू असताना या विरोधात कुणबी समाज आक्रमक झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील हजारो कुणबी बांधवांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक माेर्चा काढत सरकारचा निषेध केला.

शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणातून निघालेला हा महामोर्चा घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. बिहारच्या धर्तीवर राज्यात सर्व जातींची जातनिहाय जनगणना करावी, गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे वर्ग ३ व ४ च्या नोकर भरतीतील आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्यात यावे.

सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण व बाह्य यंत्रणेमार्फत नोकर भरतीचा शासन निर्णय तात्काळ रद्द आदी दहा मागण्यांचे निवेदन शेषराव येलेकर (राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ) यांनी जिल्हाधिकारी यांना सादर केले.

यावेळी हे निवदेन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. या मोर्चादरम्यान गडचिरोली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मंत्री पंकजा मुंडे यांनी आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांची घेतली भेट

Ahmednagar Tourism : ऐतिहासिक ठिकाणी फिरायला खूप आवडते? मग, अहमदनगरमधील 'हे' ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट

Manoj Bajpayee : "फोटो खिंचवाने थोडी आये है..."; मनोज बाजपेयी पापाराझींवर संतापले, पाहा VIDEO

WhatsApp Account: आता एक WhatsApp अकाउंट चार डिव्हाइसवर चालेल, करा 'या' काही सोप्या ट्रिक्स

Cyclone Alert : भयंकर चक्रीवादळाचं सावट! 110 किमी वेगात हवा तांडव घालणार, IMD चा गंभीर इशारा, भारतावरही संकट?

SCROLL FOR NEXT