Kunbi Records /File Photos Saam TV
महाराष्ट्र

Beed News : बीडमध्ये 27 लाख नोंदींची तपासणी; 521 गावांमध्ये आढळल्या कुणबी नोंदी, जात प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग सुकर?

Maratha Reservation : बीड जिल्ह्यामध्ये 27 लाख नोंदींची तपासणी झाली आहे. जिल्ह्यातील 521 गावांमध्ये कुणबी नोंदी आढळल्या आहेत. यामुळे जात प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यात कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा यांच्या 27 लाख 5 हजार 210 नोंदी, प्रशासनाने 1 ऑगस्ट अखेरपर्यंत तपासल्या आहेत. जिल्ह्यातील 521 गावांत 21 हजार 907 नोंदी सापडल्या आहेत. त्यापैकी 467 गावांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर आतापर्यंत जातवैधता प्रमाणपत्रासाठी 1 लाख 6 हजार 336 जणांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी 98 हजार 173 जणांना जातवैधता प्रमाणपत्र दिले गेल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन सुरू केल्यानंतर कुणबी नोंदींच्या तपासणीचे आदेश दिले गेले होते. 24 सप्टेंबर 2023 पासून कुणबी नोंदी शोधण्यासाठी विविध प्रकारच्या कागदपत्रांची तपासणी प्रशासनाने सुरू केली होती. बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्याआधारे जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र देण्यात बीड जिल्हा कायम आघाडीवर राहिला आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात किती नोंदी आढळल्या ? पाहुयात

१) बीड तालुक्यातील 18 गावात 3061 कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत.

२) गेवराई तालुक्यातील 122 गावात 4375 कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत.

३) शिरूर कासार तालुक्यातील 15 गावात 352 कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत.

४) पाटोदा तालुक्यातील 22 गावात 906 कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत.

५) आष्टी तालुक्यातील 60 गावात 5199 कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत.

६) माजलगाव तालुक्यातील 51 गावात 2200 कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत.

७) धारूर तालुक्यातील 23 गावात 817 कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत.

८) वडवणी तालुक्यातील 31 गावात 1032 कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत.

९) अंबाजोगाई तालुक्यातील 26 गावात 716 कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत.

१०) केज तालुक्यातील 55 गावात 2630 कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत.

११) परळी तालुक्यातील 18 गावात 619 कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhakari Tips: कोणत्या व्यक्तींनी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाणं टाळावे?

भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात बॅग भरून पैसे, स्वतः निलेश राणेंनी केलं स्टिंग ऑपरेशन राणेंची धाड|VIDEO

Vande Bharat Train: वंदे भारत स्लीपर, अमृत भारत; २०२६ मध्ये लॉन्च होतील नवीन ट्रेन; असतील हजारो खास फीचर्स

Pune Accident : पुण्यात पुन्हा भीषण अपघात; महामार्गावर ४ वाहनांची एकमेकांना धडक

Maharashtra Live News Update: हसन मुश्रीफ यांची पुन्हा शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यावर टीका

SCROLL FOR NEXT