Maratha Reservation : राज ठाकरेंना मराठा आंदोलकांनी घेरलं,हॉटेलमध्ये गोंधळ; आधी भेट नाकारली, नंतर चर्चेला बोलवलं!

Raj thackeray In Dharashiv : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.
Maratha Reservation : राज ठाकरेंना मराठा आंदोलकांनी घेरलं,हॉटेलमध्ये गोंधळ; आधी  भेट नाकारली, नंतर चर्चेला बोलवलं!
Raj thackeray In DharashivSaam Tv
Published On

राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळाची तयारी केलीय. या पार्श्वभूमीवर ते महाराष्ट्र दौऱ्यावर असून आज धाराशिवमध्ये आहेत. मात्र त्यांच्या दौऱ्यात मराठा आंदोलकांनी गोंधळ घातलाय. राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये राहत आहेत त्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलकांनी राडा केला. गोंधळ वाढल्यानंतर राज ठाकरेंनी त्यांना चर्चेसाठी बोलवलंय.

राज ठाकरे हे विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागलेत. यासाठी ते महाराष्ट्र दौऱ्यावर असून ते आज धाराशिव येथे आहेत. यादरम्यान राज ठाकरे यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. धाराशिवच्या दौऱ्यावर असलेले राज ठाकरे हे पुष्कक हॉटेलमध्ये थांबले होते. त्यावेळी मराठा आंदोलक जोरदार घोषणाबाजी करत पुष्पक हॉटेलमध्ये शिरले. हॉटेल मध्येच मराठा आंदोलकांनी ठिय्या मांडला. एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केलं.

मराठा आंदोलकांना भेट नाकारल्याने आंदोलक आक्रमक झाले होते. गोंधळ वाढल्यानंतर राज ठाकरे यांनी आंदोलकांना चर्चेसाठी बोलवलं. स्वत: राज ठाकरे हे आंदोलकांच्या भेटीला येऊन उद्या चर्चा करण्यासाठी येण्याचं आवाहन केलं. मात्र राज ठाकरे यांचे आवाहन धुडकावत ठाकरे यांच्याविरोधात मराठा आंदोलकांनी परत घोषणाबाजी सुरू केली.

महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोलापूर दौऱ्यादरम्यान मराठा आरक्षणाविषयी मोठं विधान केलं होतं. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे राज ठाकरे हे स्वतः महाराष्ट्र दौरा करत आहेत. आज सोलापूर दौऱ्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्यातील ओबीसी- मराठा आरक्षणाच्या संघर्षावरुन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर टीका करत त्यांनी महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नसल्याचं मोठं विधान केलं.

मनोज जरांगे संतापले

या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही. मराठा ओबीसी वाद हे मताचे राजकारण आहे, असे वक्तव्य राज ठाकरेंनी केले होतं. राज ठाकरेंच्या या वक्तव्याला मनोज जरांगें पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. ज्यांना आरक्षणातील काही कळत नाही, त्यांच्यावर काय बोलावं? असं प्रतिक्रिया  मनोज जरांगेंनी दिली.

Maratha Reservation : राज ठाकरेंना मराठा आंदोलकांनी घेरलं,हॉटेलमध्ये गोंधळ; आधी  भेट नाकारली, नंतर चर्चेला बोलवलं!
Vidhansabha Election 2024 : राज ठाकरेंचे दोन शिलेदार ठरले, एक उद्धव ठाकरे, तर दुसरा भाजपविरोधात, कोण मारणार बाजी?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com