Kunal Kamra Latest News Update Saam Tv
महाराष्ट्र

Kunal Kamra Controversy : सलग दुसऱ्या दिवशी कामराच्या शोच्या सेटवर BMC ची कारवाई, गॅस कटरनं स्टुडिओचं बांधकाम तोडलं

Kunal Kamra Latest News Update : कुणाला कामराने विडंबन गीताच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. त्यांनतर कामराने ज्या स्टुडिओमध्ये हा शो केला, त्या स्टुडिओतील अनधिकृत बांधकाम महापालिकेकडून तोडण्यात आले.

Yash Shirke

Kunal Kamra News : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन गीत तयार केले. गाणं व्हायरल झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आक्रमक झाली. ज्या स्टुडिओमध्ये कुणाल कामराचा स्टँडअपचा शो झाला होता, त्या स्टुडिओची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर पर्यटनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या सूचनांवरुन महापालिका अधिकारी स्टुडिओची पाहणी करण्यासाठी गेले.

महापालिका वॉर्ड ऑफिसर विसपुते आणि त्यांच्या पथकाने काल 'द हॅबिटॅट' स्टुडिओची पाहणी केली आणि स्टुडिओतील अनधिकृत भाग घोषित करत कारवाई केली. आज सलग दुसऱ्या दिवशीही पालिकेकडून स्टुडिओमधील अनधिकृत स्टुडिओवर तोडक कारवाई करण्यात आली आहे. गॅस कटरच्या सहाय्याने उर्वरित अनधिकृत भाग काढण्याचे काम सुरु आहे.

दी युनि कॉन्टिनेन्टल हॉटेलमध्ये द हॅबिटॅट स्टुडिओ आहे. कुणाल कामराने या स्टुडिओमध्ये शो केला होता. काल महापालिका अधिकाऱ्यांनी स्टुडिओची पाहणी केली. तपासातून स्टुडिओतील मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर महापालिकेद्वारे तेथे तोडक कारवाई करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन गीत सादर केल्याने कुणाल कामराविरोधात राज्यभरात शिवसैनिकांनी आंदोलन केले आहे. 'मी माफी मागणार नाही', असे कुणाल कामरा म्हणाला आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी कामराच्या कृतीचे समर्थन केले आहे. शिंदेंवर टीका केल्याने कुणाल कामरा शिवसैनिकांच्या निशाण्यावर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात भयकंर घडलं! दारूसाठी पैसे मागितले, आईने दिला नकार; तरुणाने आईवर चाकूने केले सपासप वार

Gautami Patil: 'राधा ही बावरी' गौतमी पाटीलचं सुंदर सौंदर्य; फोटो पाहा

Gautami Patil Dance : काय सांगू रं गोविंदा, गौतमीने दावली फिल्मी अदा; मुंबईकरांचा दहीहंडीचा उत्साह शिगेला, VIDEO

Maharashtra Live News Update: इंदापुरात दहाहून अधिक नागरिकांना पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला चावा

Election Commission press conference : निवडणूक आयोगाची उद्या पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार की आणखी काही...

SCROLL FOR NEXT