Kunal Kamra again harasses Shivsena workers Saam Tv News
महाराष्ट्र

Kunal Kamra : कुणाल कामराने पुन्हा शिंदेंच्या कार्यकर्त्यांना डिवचलं, म्हणाला भाजपच्या लोकांना पण...

Kunal Kamra Again Harasses on Shivsena Workers : माझा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून मला ५०० कॉल आलेत. या कॉल्समध्ये खून आणि शरीराचे अवयव तोडण्याच्या धमक्या देण्यात येत आहे.

Prashant Patil

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर अडचणीत आलेला कुणाल कामरा मागे हटण्यास तयार नाही. आता त्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून किंवा नेत्यांकडून मिळत असलेल्या धमक्यांवर तीव्र टीका केली आहे. तो म्हणाला की, माझा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून मला ५०० कॉल आलेत. या कॉल्समध्ये खून आणि शरीराचे अवयव तोडण्याच्या धमक्या देण्यात येत आहे. या सर्व धमक्या फक्त शिवसेनेच्या लोकांनी दिल्या आहेत. पण भाजप समर्थकांकडून कोणताही फोन मला आलेला नाही. यावरुन असं दिसून येतं की एकनाथ शिंदे हे कदाचित त्यांच्या सत्तेतील भागीदार असलेल्या भाजपशी असलेल्या संबंधित लोकांनाही आवडत नाहीत. कुणालने प्रसारमाध्यमाशी बोलताना असं म्हटलं आहे.

कुणाल कामराने 'दिल तो पागर है' या चित्रापटातील 'भोली सी सूरत' विडंबनात्मक गाणे गायले. या गाण्यात त्याने एकनाथ शिंदेंवर टीका केली होती आणि त्यांना देशद्रोही म्हटलं होतं. कामराने कोणाचंही नाव घेतलं नाही पण ज्या पद्धतीने त्याने दाढी, ठाणे आणि रिक्षा असे शब्द वापरले त्यावरुन त्याचा रोख एकनाथ शिंदे यांच्याकडे होता हे स्पष्ट झालंय. २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरेंविरुद्ध बंड केलं होतं. त्यांनी ४० आमदारांसह बंड करत भाजपच्या पाठींब्याने सरकार स्थापन केलं होतं. त्यांनी सरकारचे नेतृत्व केलं आणि सुमारे अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून काम केलं. त्यांच्या बंडाला उद्धव ठाकरे गटाने विश्वासघात तथा गद्दार असं म्हटले. अशा परिस्थितीत, कुणाल कामराचे शब्द ठाकरे गटाने वापरेल होते, असंही शिंदे समर्थक म्हणत आहेत.

कुणाल कामराने मुंबईतील खार परिसरात असलेल्या हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये एक कार्यक्रम सादर केला. यावेळी कामराने एकनाथ शिंदे यांच्यावर एक विडंबनात्मक गाणे गायले. जेव्हा हे गाणे व्हायरल झाले आणि शिवसैनिकांपर्यंत पोहोचले तेव्हा ते नियंत्रणाबाहेर गेले. मात्र, या प्रकरणात राजकारणही तापलं आहे.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

एकनाथ शिंदे यांनीही यावर एक विधान केलं आणि ते म्हणाले की प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. काल सोमवारी शिवसैनिकांचा जमाव हॅबिटेट सेंटरमध्ये पोहोचला होता तिथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याशिवाय स्टुडिओचीही तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी आतापर्यंत एकनाथ शिंदे यांचं समर्थक राहुल कनाल आणि एका शिवसेना कार्यकर्त्यासह १२ जणांना अटक केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT