Family members of Santosh Deshmukh raise serious allegations as fugitive accused Krishna Andhale remains at large in Beed murder case. Saam Tv
महाराष्ट्र

संतोष देशमुखांच्या हत्येचा आरोपी कृष्णा आंधळे तीनदा गावात; राजकीय अभय?

Krishna Andhale Visited Village Three Times In Beed: संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुख्य आरोपी कृष्णा आंधळे फरार असतानाही तब्बल तीन वेळा गावी येऊन गेल्याचा खळबळजनक दावा मृत संतोष यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे.

Girish Nikam

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या हत्या प्रकरणात एका वर्षापासून फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळेबाबत गूढ असतानाच कृष्णा तब्बल तीन वेळा गावात येऊन गेल्याचा खळबळजनक दावा मृत संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आरोपीला कोणाचे तरी संरक्षण मिळत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तर पोलीस आरोपींचा बचाव करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केलाय.

'हे आरोपी सैतानी वृत्तीचे लोकं'

धनंजय देशमुख, मृत संतोष देशमुखांचे भाऊ

'पोलीस आरोपींचा बचाव करत आहे'

प्रकाश सोळंके, आमदार, राष्ट्रवादी (AP)

'ही गंभीर बाब, देशमुख कुटुंबाला धोका'

मनोज जरांगे, मराठा आंदोलक

मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनीही ही गंभीर बाब असल्याचं म्हणत देशमुख कुटुंबाला धोका असल्याचा इशारा दिलाय. संतोष देशमुखांची 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. याला आता वर्षभरापेक्षा जास्त काळ लोटला गेलाय. मात्र कृष्णा आंधळे अजूनही मोकाटच आहे. तो मोबाईल वापरत नसल्यामुळे त्याचा छडा लागत नसल्याचं पोलिसांचं म्हणणं असेल तर ज्या काळात मोबाईल नव्हते त्या काळात गुन्हेगार जेरबंद होत नव्हते का? हा खरा प्रश्न आहे. कृष्णा आंधळे मोकाट असेपर्यंत देशमुख कुटुंबीयांनाही धोका आहे. त्यामुळे आंधळेला लवकरात लवकर अटक करण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : पालघरमध्ये भूकंपाच्या पार्श्वभूमीवर NDRFचे जनजागृती प्रशिक्षण

Petrol and Diesel Prices : पेट्रोल-डिझेल अचानक महागले; या राज्य सरकारने लावला 'विशेष सेस', नवी दरवाढ लागू

Tea Affect On Digestion System: चहा प्यायल्याने पचनक्रियेवर काय परिणाम होतो? जाणून घ्या ‘हे’ 5 महत्त्वाचे फायदे- तोटे

Daulatabad Fort : इतिहासातील सर्वात मजबूत किल्ल्यांपैकी एक! दौलताबादच्या अभेद्य संरक्षण रचनेचं रहस्य वाचून थक्क व्हाल

Eggs and cholesterol: अंडं खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का? जाणून घ्या कोणत्या व्यक्तींनी अंडं खावं पूर्णपणे टाळावं?

SCROLL FOR NEXT