Nashik Crime News Saam TV
महाराष्ट्र

Nashik Crime News : नाशिकमध्ये कोयता गँगची दहशत; बहिणीला का छेडलं? भावानं जाब विचारल्याने दोघांवरही हल्ला

या घटनेत दोघे बहीण भाऊ जखमी झाले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

तरबेज शेख

Nashik News : पुणे पाठोपाठ नाशिकमध्ये देखील कोयता गँगची दहशत सुरू झाली आहे. बहिणीला छेडण्याचं कारण विचारण्यासाठी गेलेल्या बहिण- भावावर टोळक्याने कोयत्याने वार केल्याची, धक्कादायक घटना सिडको भागातील बुरकुले हॉल परिसरात रविवारी सायंकाळच्या सुमारास घडलीये. (Latest Nashik News)

या घटनेत दोघे बहीण भाऊ जखमी झाले आहेत. भावाच्या हातवर, कमरेवर आणि डोक्यावर जबर मार लागला आहे. तर बहिणीच्या हातावर कोयत्याने वार केले आहेत. सध्या दोन्ही भावंडांवर जिल्हा शासकीय रुग्णायलाय उपचार सुरू आहेत. तर या टोळक्यावर अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बहीण क्लासवरून घरी येत होती. त्या वेळी काही मुलं हे सिडको परिसरातील बुरकुले हॉल या ठिकाणी बसले होते. यावेळी बहिणीला बघून त्यांनी अश्लील हावभाव केले. तसेच तिला चिडवले. हा संपूर्ण प्रकार तिने तिच्या भावाला सांगितला. भाऊ नाव घेण्याचं कारण विचारायला गेला असता यावेळी बसलेल्या टावाळखोरांनी आपल्याजवळ असलेला कोयता बाहेर काढला आणि भावाला मारायला सुरुवात केली. बहिणीने हे बघितल्यावर त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी त्या टवाळखोरांनी तिच्यावर देखील कोयत्याने हल्ला चढवला. यात ती देखील जखमी झाली असून तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बहिणीच्या हातावर जखम झाली असून ती या धक्क्यामधून अद्याप सावरलेली नाही.

टवाळखोरांवर लवकरात लवकर कारवाई व्हावी आणि त्यांना अटक व्हावी अशी मागणी नातेवाईकांसह बहिण भावाने केली आहे. यावरून मात्र शहरांमध्ये किती मोठ्या प्रमाणात गुंडागिरी वाढली आहे हे दिसून येत आहे. तर पोलिसांचा धाक गुंडांना राहिला आहे की नाही..? हाच प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठी लोक कुणाची भाकर खातायेत?' निशिकांत दुबे मराठीविरोधात बरळले| पाहा VIDEO

Solapur Crime: नवऱ्याचं डोकं सटकलं; चार्जरच्या वायरने बायकोचा गळा आवळला, नंतर स्वत:लाही संपवलं

Maharashtra Live News Update : पुण्यातील रामवाडीमध्ये पेट्रोल चोराने सहा मोटरसायकल जाळल्या

Sara Arjun: रणवीर सिंगसोबत 'धुरंधर' चित्रपटात झळकणारी अभिनेत्री नक्की आहे तरी कोण?

Manikgad Fort Tourism : नयनरम्य निसर्ग अन्...; पनवेलपासून हाकेच्या अंतरावर वसलाय ऐतिहासिक किल्ला, एकदा पाहाच...

SCROLL FOR NEXT