Koregaon assembly constituency :  Saam tv
महाराष्ट्र

Koregaon assembly constituency : कोरेगावमध्ये पारंपरिक शिंदेशाही लढत; शशिकांत शिंदे पराभवाची परतफेड करणार का? VIDEO

Koregaon Political News : राज्यातील लक्षवेधी लढतींपैकी एक असलेल्या कोरेगावमध्ये महेश शिंदे विरुद्ध शशिकांत शिंदे यांच्यात महाभारत रंगलंय.. मात्र कोरेगावचं समीकरण नेमकं कसं आहे? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट

Saam Tv

भरत मोहळकर, साम टीव्ही

कोरेगाव : विधानसभा निवडणुकीने चांगलाच रंग पकडलाय.. त्यातच महाराष्ट्रातील लक्षवेधी लढतींपैकी एक असलेल्या सातारा जिल्ह्यातील कोरेगावमध्ये पुन्हा दोन शिंदेंमध्ये सामना रंगणार आहे. शिंदे गटाने विद्यमान आमदार महेश शिंदेंना पुन्हा संधी दिलीय. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने लोकसभेला पराभूत झालेल्या शशिकांत शिंदेंवर विश्वास दाखवलाय.. मात्र दोन्ही शिंदेंनी आपलाच विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय..

2019 च्या विधानसभेला शशिकांत शिंदेंचा निसटता पराभव झाला. हा पराभव जिव्हारी लागल्याने पवारांनी शशिकांत शिंदेंना विधानपरिषदेवर संधी दिली. पुढे शिवसेनेच्या फुटीनंतर महेश शिंदेंनी एकनाथ शिंदेंना साथ दिली. तर राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांचे निकटवर्तीय असलेल्या शशिकांक शिंदेंनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. मात्र 2019 च्या विधानसभेला मतांचं गणित कसं होतं? पाहूयात..

2019 मधील मतांचं गणित

महेश शिंदे, शिवसेना, 1 लाख 1 हजार 487 मतं

शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस, 95 हजार 255 मतं

6 हजार 232 मतांनी महेश शिंदेंचा विजय

कोरेगावची लढत आता भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचा अशा वेगळ्या वळणावर पोहचली आहे. महेश शिंदेंनी आपण भूमिपूत्र असून मतदारसंघात शेकडो कोटींचा निधी आणून सिंचन आणि रस्त्यांची कामं केल्याचा दावा केलाय.. तर शशिकांत शिंदेंनी मतदार निष्ठावंतांना साथ देतील आणि हुकूमशाहीला गाढतील असं म्हटलंय.

मात्र सध्या 2019 पेक्षा परिस्थिती वेगळी आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शशिकांत शिंदेंची पराभवाची मालिका थांबवणार की महेश शिंदे पुन्हा बाजी मारणार? याची उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chembur Exit Poll: चेंबूर मतदारसंघातून कोण मारणार बाजी? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: कोपरी-पाचपखाडी मतदारसंघातून एकनाथ शिंदे होणार आमदार? पाहा Exit Poll

Wardha Exit Poll: वर्ध्यात भाजपचे पंकज भोयर तिसऱ्यांदा होणार आमदार? पाहा Exit Poll

Maval Exit Poll Result : बंडखोर की विद्यामान, मावळची जनता कुणाच्या मागे? एक्झिट पोलचा अंदाज काय?

Pension: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ८ दिवसांत हे काम करा, नाहीतर पेन्शन विसरा

SCROLL FOR NEXT