Ajit Pawar,Aaditya Thackeray,Jayant Patil Saam Tv
महाराष्ट्र

Ratnagiri: राणेंच्या बालेकिल्ल्यात "या" तीन मंत्र्यांचा दौरा

कोकणामध्ये राजकीयदृष्ट्या आजचा सोमवार महत्त्वाचा ठरणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रत्नागिरी: कोकणामध्ये राजकीयदृष्ट्या आजचा सोमवार महत्त्वाचा ठरणार आहे. कारण राज्याच्या मंत्रिमंडळातील ३ बडे नेते कोकण (Konkan) दौऱ्यावर आहेत. युवासेना प्रमुख आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सिंधुदुर्ग येथे, उपमुख्यमंत्री अजित पवार रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये तर जलसंपदा मंत्री जयंत पाटील चिपळूण दौऱ्यावर आहेत. दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पक्ष बांधणी, गेल्या काही दिवसांमध्ये कोकणामध्ये होत असलेल्या राजकीय घडामोडी, आरोप- प्रत्यारोप या पार्श्वभूमीवर या तिन्ही मंत्र्यांच्या दौऱ्याला नक्कीच महत्त्व राहणार आहे.

युवासेना प्रमुख आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) या ३ जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. विशेष म्हणजे त्यांचा सिंधुदुर्गात दौरा हा महत्त्वाचा असणार आहे. देवगड नगरपंचायत निवडणुकीमध्ये (election) विजयी झालेल्या नगरसेवकांचा सत्कार करणार आहेत. मुख्य गोष्ट म्हणजे भाजपचे आमदार नितेश राणे यांचा गड म्हणून देवगड बघितले जाते. पण नगरपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेना मिळवलेला विजय हा चर्चेचा राहिला होता. अर्थातच आदित्य ठाकरे काही ठिकाणी भेटी देणार आहेत आणि उद्घाटन करणार आहेत.

हे देखील पहा-

शिवाय काही कार्यक्रमांना देखील उपस्थिती लावणार आहेत. असे असले तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या काही कालावधीमध्ये होत असलेल्या घडामोडी, राणे विरुद्ध शिवसेना असा वाद, जिल्हा बँक (District Bank) निवडणुकीच्या वेळी झाले असलेले राजकारण, शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरण यानंतर आदित्य ठाकरे पहिल्यांदा ३ दिवसांच्या कोकण दौऱ्यावर येत आहेत. कोकणामध्ये म्हटले आहे की शिवसेनेचा बालेकिल्ला हे समीकरण. पण सध्या कोकणात शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे प्रयत्न भाजपकडून होत आहेत. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस देखील पक्षबांधणी आणि पक्ष वाढीवर भर देताना दिसून येत आहे.

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचा केवळ एक आमदार कोकणात आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पक्षाला मरगळ देखील आली आहे. प्रमुख नेत्यांचे झाले असलेले दुर्लक्ष यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्त्व दिसेनासे झाले होते. पण काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कोकणात लक्ष घालायला सुरुवात केली आहे. सुनील तटकरे, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी देखील कोकणामध्ये भेटीगाठी सुरु केले आहेत. नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेबरोबर एकत्र निवडणुका लढवले आहेत. यावेळी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाढलेल्या दिसून आले आहेत. सुनील तटकरे त्यांनी दापोली आणि मंडणगडमध्ये लक्ष घातल्याचे दिसून आले आहे.

यामुळे आगामी काळामध्ये शिवसेनेचा आमदार असलेल्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आपले बळ वाढवत पक्ष बांधणी करत असल्याच्या चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात रंगले आहेत. शिवाय शिवसेनेत सुरु असलेल्या अंतर्गत बंडाळीचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस कशी घेत आहे. याबाबत देखील सांगितले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या सर्व शक्यता फेटाळले आहेत. पक्षबांधणी, पक्षवाढीचा अधिकार सर्वांनाच आहे. त्यामध्ये वेगळे काय असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. मात्र, असे असले तरी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे वाढलेले दौरे यावरुन २०२४ साली कशा पद्धतीचे राजकारण होऊ शकते याविषयी चर्चा सुरु आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

Shivneri To Vasai Fort: शिवनेरी किल्ल्यापासून वसई किल्ल्यापर्यंत कसे पोहोचाल? जाणून घ्या सर्व पर्याय

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

Latur Tourism : पावसाळ्यात हिरवळ, धबधबा आणि शांतता हवीय? मग सहस्त्रकुंड नक्की पाहा

MNS- Shivsena: झाली युती झाली...; राज- उद्धव ठाकरे भेटीनंतर भास्कर जाधवांचं मोठं विधान, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT