गेल्या काही दिवसांपासून कोकणातील राजकीय घडामोडीमुळे ठाकरे गटाचं टेन्शन वाढलंय. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव नाराज असल्यानं ते पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. आमदार भास्कर जाधव यांची नाराजी दूर करण्यासाठी खुद्द पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे त्यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. पण भास्कर जाधव यांनी शिंदे गटातील मंत्री उदय सामंत याचे कौतुक केल्यानं पुन्हा नव्यानं वेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
आज पत्रकार परिषदेत आपल्या नाराजीवरून बोलतांना भास्कर जाधव यांनी शिंदे गट शिवसेनेचे आमदार आणि मंत्री उदय सामंत यांचे कौतुक केलं. त्याचवेळी राज्यातील सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केलीय. नंतर त्यांनी शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांचे कौतुक केलं. त्यामुळे भास्कर जाधव यांच्या मनात चाललंय काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना भास्कर जाधव यांनी सरकारच्या कारभारावर टीका केलीय. सध्या भ्रष्ट राजकीय कारभार सुरू आहे. प्रचंड भ्रष्टाचारचा पैसा वापरून आपलें उमेदवार उभे करून निवडणूका जिंकायच्या तिथही यश आलं नाही. तर तिथले लोकांना पैशाने विकत कसे घ्यायचं हे नवीन फॅड देशात आणि राज्यात सुरु झाल्याची टीका भास्कर जाधव यांनी केलीय.
ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावरही टीका केली. माझ्यामुळं रामदास कदमांच्या वृत्तीमध्ये, त्यांच्या वागण्यात,विचारांत बदल झाला असेल तर मला त्याचा आनंद आहे. म्हणून मी रामदास कदमांना हेच सांगेन आता त्या काळ्या जादू, बंगाली जादू याच्या भानगती ऐवजी आता तुम्ही सुद्धा आता तुम्ही चांगला मार्ग पत्कारावा, असं भास्कर जाधव म्हणालेत. रामदास कदम हे हवेमध्ये गोळीबार करणारा माणूस, त्यांना काय कोणता पुरावा द्यायची गरज नाही. ते फक्त बेचूड आरोप करतात. रामदास कादमांच्या फार बोलण्याकडे आपण लक्ष देत नाही, असंही भास्कर जाधव म्हणाले.
त्यानंतर भास्कर जाधव यांनी शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री उदय सामंत यांचे कौतुक केलं. उदय समांतानी माझ्याबद्दल सद्भावना व्यक्त केली असेल तर आनंदच आहे. जिल्ह्यात आपण वेगवेगळ्या विचारांचं, वेगवेगळ्या पक्षांमध्ये जरी काम करत असलो तरी तरी निश्चित पणे एकमेकांना जिल्ह्याच्या विकासाला फायदा होत असेल तर एकमेकांबद्दल सहानुभूती ठेवली पाहिजे. त्यांनाही वेगवेगळी मंत्री पद मिळाली मी कधीही त्यांचा द्वेष केला नाही, अस ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव म्हणाले.
कोकणातील लोक माझ्याकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जबाबदारीचे नेतृत्व म्हणून बघत असतील तर माझी जबाबदारी वाढलेली आहे. पण माझ्यावर जबाबदारी द्यायची की नाही हे पक्षाने ठरवावे,असं जाधव म्हणालेत.
भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही तोंडसूख घेतलं. देवेंद्र फडणवीस चालक माणूस असून या असा माणूस महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही. हिंदी भाषेचा गाठोड्यात गुंडाळलेला मुद्दा अचानक बाहेर कसा आला, असं म्हणत त्यांनी फडणवीस यांच्या चालाखीवरून टीका केली.
मतदानाचा टक्का कसा वाढला याचा निकाल 25 तारखेला लागणार आहे. राहुल गांधी यांनी ह्या गोष्टी पुराव्यानिशी मांडल्या आहेत. मतदानाचा पुरावा नष्ट 45 दिवसांनंतर करून टाका असा कायदा काढला मग तुम्ही स्वच्छ आहात तर या कायद्यासाठी घाई का केली. आज ही लोकशाही पूर्णपणे डोक्यात आहे. राहुल गांधी जे म्हणताय त्याची दखल आज या देशामध्ये घेतली पाहिजे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.