
ऐकलंत मनसेचे नेते संदिप देशपांडेंनी काय म्हटलंय. ते म्हणतायेत महाराष्ट्राच्या विधीमंडळात षंढ बसलेत. होय हे म्हणणं आहे मनसेच्या संदिप देशपांडेंचं. तर संदिप देशपांडे इतके संतप्त झाले त्याला कारण ठरला केंद्र सरकारचा राज्यातील कार्यक्रम. संसदेच्या अंदाज समितीला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर विधान भवनात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आलं.
मात्र पहिल्याच दिवशी या कार्यक्रमानं राज्यातील हिंदी सक्ती विरोधातील आंदोलनाचा भडका उडलाय. एकीकडे हिंदी सक्तीविरोधात राज्यात वातावरण तापलेलं असतांना या राष्ट्रीय कार्यक्रमाचं महाराष्ट्रात आयोजन करुन तिथे लावण्यात आलेल्या फलकांवर मराठीला डावलून सर्रास हिंदीचा वापर करण्यात आला. त्यामुळे मराठीसाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनसेच्या संदिप देशपांडेंनी जहरी टिका केल्यानंतर आता थेट संदिप देशपांडेवर हक्कभंग आणण्याची धमकी देण्यात आलीये.
मंत्री गुलाबराव पाटलांनी धमकी दिल्यानंतर संदीप देशपांडेंनी खुशाल हक्कभंग आणा, हे एका व्यक्तीसाठी नसून प्रवृत्तीला म्हटलं असल्याचं सांगत सारवासारव केलीय. मनसेच्या या आक्रमक भूमिकेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मात्र सावध भूमिका घेत हा कार्यक्रम लोकसभेचा होता असं म्हणत प्रश्नाला बगल दिली.
एकनाथ शिंदेंच्या या प्रतिक्रियेनंतर या कार्यक्रमात मराठीचा अपमान झाला हे स्पष्ट तर झालंय पण हे स्विकारायला कोणीही तयार नाही असं दिसतंय. त्यामुळे मराठीसाठी मनसेनं सत्ताधाऱ्यांना षंढ म्हणून त्यांच्यावर केलेल्या टिकेवरुन वाद करण्यापेक्षा मराठी भाषेसाठी सगळ्यांनी आक्रमक भूमिका घेऊन मराठीचं संवर्धन करायला पाहिजे अन्यथा आपुल्याच घरात हाल सोसते मराठी असं म्हणावं लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.