एकनाथ शिंदेंनी कोकणात ठाकरे गट खिळखिळा केलाय.राजन साळवींना गळाला लावून शिंदेंनी ठाकरेंना धक्का दिलाय. मात्र शिंदेंनी साळवींना पक्षात घेऊन सामंत बंधूंना पर्याय तयार केलाय का? आणि शिंदेंनी एका दगडात दोन पक्षी मारलेत का? यावरचा हा विशेष रिपोर्ट. बाळासाहेब ठाकरेंचं आणि कोकणच्या जनतेचं भावनिक नात आहे. मात्र सध्या याच कोकणात उद्धव ठाकरेंच्या सेनेला धक्के बसताना पहायला मिळत आहेत.
माजी आमदार राजन साळवींनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र या राजकीय खेळीनं एकनाथ शिंदेंनी सामंत बंधूंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात एक पर्याय दिल्याचं बोललं जात आहे. उद्योगमंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू आमदार किरण सामंत यांचा साळवींच्या प्रवेशाला विरोध होता. मात्र तरीही शिंदेंनी माजी आमदार साळवींना पक्षात घेऊन एकप्रकारे सामंत बंधूंना शह दिलाय.
शिवसेनेचे सलग 5 वर्षे जिल्हाप्रमुख म्हणून लक्षवेधी कारकीर्द
राजापूर विधानसभा मतदारसंघातून सलग तीनवेळा आमदार
2009, 2014, 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत विजयाची हॅटट्रीक
2024 विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाचे उमेदवार किरण सामंताकडून ठाकरे गटाचे उमेदवार राजन साळवींचा पराभव
शिवसेनेत उदय सामंत यांचं प्रस्थ वाढलंय. शिंदेंना डावलून शिवसेनेत नवा 'उदय' होईल, असा दावा काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवारांनी काही दिवसांपूर्वी केला होता. तर शिंदे गटाचे 20 आमदार उदय सामंतांसोबत असल्याचं सांगत संजय राऊतांनीही खळबळ उडवून दिलीय. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी सामंताचा एकेकाळचा सहकारी मात्र आत्ताच्या विरोधकाला पक्षात घेऊन एकप्रकारे शह दिला आहे.
महायुतीत एकनाथ शिंदे नाराज असल्याची वारंवार चर्चा होत असते. मात्र पक्षांतर्गत राजकारणातही शिंदेनी पकड ढिली होऊ दिली नाही. राजन साळवी पक्षात आल्यानं शिंदे सेनेची कोकणात ताकद वाढली आहे एवढं निश्चित.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.