Shiv Sena Saam TV
महाराष्ट्र

Shiv Sena: उद्धव ठाकरेंना कोकण दौऱ्याआधीच मोठा धक्का; बड्या आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

Uddhav Thackeray: दळवी सलग 25 वर्ष आमदार राहिले आहेत. १९९० ते २०१४ या काळात दापोलीतून शिवसेनेचे आमदार असलेले सूर्यकांत दळवी आज ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करणार आहेत.

Ruchika Jadhav

Suryakant Dalvi News :

आगामी लोकसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. अशात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे येत्या 4 फेब्रुवारीला सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. मात्र कोकण दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मिळालाय.

बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळख असलेले आमदार सूर्यकांत दळवी आज भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. १९९० ते २०१४ या काळात दापोलीतून शिवसेनेचे आमदार असलेले सूर्यकांत दळवी आज ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करणार आहेत.

दुपारी १ वाजता भाजप प्रदेश कार्यालयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सूर्यकांत दळवी यांचा पक्षप्रवेश होणार आहे.

उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून कोकण दौऱ्यावर आहेत. 4 फेब्रुवारीला ते सिंधुदुर्ग आणि 5 फेब्रुवारीला रत्नागिरीत असणार आहेत. रत्नागिरीतील तीन विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा दौरा असणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र त्याआधीच सूर्यकांत दळवींनी भाजपमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT