Kolhapur Farmer Death News Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur : वाहन सर्व्हिसिंग मशीनने बैल धुणं पडलं महागात; कोल्हापुरात शॉक लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Kolhapur Farmer Death News : कोल्हापूरमध्ये गोठ्यात बैल धुत असताना विजेचा शॉक लागून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वाहन सर्व्हिसिंग मशीनमध्ये अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने ही दुर्घटना घडली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Alisha Khedekar

  • कोल्हापूरमध्ये विजेचा धक्का लागून दोन जणांचा मृत्यू

  • बैल धुत असताना दुर्घटना घडली

  • भगवान सोनवणे आणि धीरज नाईक यांचा जागीच मृत्यू

  • पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

रणजित माजगावकर, कोल्हापूर

Kolhapur Hupri Ingli 2 Farmer Death कोल्हापूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. हुपरी-इंगळी रस्त्यावर काल म्हणजेच बुधवार ४ मार्च रोजी संध्याकाळी विजेचा धक्का लागून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गोठ्यात बैल धुवत असताना वाहन सर्व्हिसिंग मशीनमध्ये अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हुपरी येथील खेमलापुरे यांच्या सुमारे शंभर जनावरांच्या गोठ्यात नेहमीप्रमाणे संध्याकाळी बैल व म्हशी धुण्याचे काम सुरू होते. यावेळी खेमलापुरे यांचे भाचे धीरज सहदेव नाईक व कामगार भगवान खंडू सोनवणे हे वाहन सर्व्हिसिंग मशीनच्या सहाय्याने जनावरे धुत होते. मात्र अचानक मशीनमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने दोघांनाही तीव्र विजेचा धक्का बसला.

धक्का इतका जबरदस्त होता की, दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी गोठ्याकडे धाव घेतली आणि दोघांना तत्काळ हुपरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये भगवान खंडू सोनवणे आणि धीरज सहदेव नाईक यांचा समावेश आहे.

दरम्यान, रात्री उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून या प्रकरणी हुपरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT