almatti dam, kolhapur rain
almatti dam, kolhapur rain Saam Tv
महाराष्ट्र

सांगली, कोल्हापूरसाठी आनंदाची बातमी! अलमट्टीचा विसर्ग वाढवणार

संभाजी थोरात

कोल्हापूर: गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. कोल्हापूरसह सांगलीत पूरस्थिती निर्माण झाली आहे. यावर आता कोल्हापूर आणि सांगली (Sangli) जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी समोर आली. अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. आज दुपारी २.३० वाजल्यापासून विसर्ग १ लाख ७५ क्युसेक करण्यात येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने (Rain) पुन्हा मुसळधार पावसाने सुरूवात केली आहे. गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी ३८ फूट १० इंच झाली आहे. त्यामुळे चिखली ता.करवीर येथील नागरिकांना प्रशासन आणि पोलीस यांच्याकडून स्थलांतरीत केले जात आहे.

आज पहाटे पाच वाजता राधानगरी धरणाचा ६ क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला आहे. दरवाजातून १४२८ पॉवर हाऊसमधूनचा १६०० असा एकूण ३०२८ क्येसक विसर्ग सुरू आहे. (Kolhapur Rain Update)पंचगंगा नदीपात्राने काल इशारा पातळी गाठली. रात्री १० वाजता राजाराम बंधाऱ्याजवळ ३९ फूट पाणी पातळी झाली होती. चिखली, आंबेवाडीतील नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आवाहन करण्यात आले होते.

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात गेल्या ३ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील राधानगरी पाणलोट क्षेत्रासह, आजारा, गगनबावडा परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरण सध्या ९८% भरले आहे. धरणांतून ३०२८ क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे.

कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे पाणी पातळीत वाढ होत आहे, त्यामुळे स्थलांतरित होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी ३८ फूट १० इंच झाली आहे. त्यामुळे चिखली ता.करवीर येथील नागरिकांना प्रशासन आणि पोलीस यांच्याकडून स्थलांतरीत केले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT