आता निवडणूक झाल्यानंतर त्या 12 जणांकडे बघणार आहोत
48 तासांची दिली डेडलाईन अजूनही वेळ गेलेली नाही पाठिंबा द्या
मुख्यमंत्र्यांनीच आम्हा दोघांना मुंबईला बोलावून चर्चा घडविली
रणजीत माजलगावकर
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात भुतो ना भविष्य असा राजकीय बदल घडला. हा बदल म्हणजे कट्टर वैरी असलेले हसन मुश्रीफ आणि समरजीत सिंह घाटगे हे दोघेही एकत्र आले.घाटगे आणि मुश्रीफ यांनी यांच्या युती घडवण्यात एका अदृश्य शक्ती होती, त्या शक्तीच्या पुढाकाराने आम्ही विकासासाठी हातमिळवणी केली असल्याचे दोघांनी सांगितलं होतं. मात्र आता ही अदृश्य शक्ती कोणाची होती याची माहिती उघड झालीय.स्वत: समरजीतसिंह घाटगे युती घडवण्यामागील अदृश्य हात कोणाची याची माहिती दिलीय.
एका सभेत बोलतांना समरजीतसिंह घाटगे यांनी अदृश्य हात कोणाचे आहेत, हे सांगितलं. मुख्यमंत्र्यांनीच आम्हा दोघांना एकत्र आणलं असं घाटगे म्हणालेत. घाटगे यांच्या आधी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनीही अदृश्य हाताचा उल्लेख केला होता. मुश्रीफ आणि घाटगे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करत, “जे नाराज कार्यकर्ते असतील त्यांची समजूत घाला. मतदारांपर्यंत विकासाचा संदेश पोहोचवा, असं सांगितलं होतं. आता घाटगे यांनी युती कशी घडली का केली याची माहिती देताना आपल्या भागातील राजकीय विरोधकांना सुचक इशारा दिलाय.
हसन मुश्रीफ आणि समरजीत सिंह घाटगे युती घडवण्यामागील अदृश्य हात म्हणजे मुख्यमंत्री. मुख्यमंत्र्यांनीच आम्हा दोघांना मुंबईला बोलावून चर्चा घडविली, अशी कबुली समरजीत सिंह घाटगे यांनी प्रचार दिली. मागील १० वर्षात ८ ते १२ जण आम्हा दोघांकडून फायदा उचलत होते. याची आम्हा दोघांनाही कल्पना नव्हती.
आता निवडणूक झाल्यानंतर त्या १२ जणांकडे बघणार आहोत. 48 तासांची दिली डेडलाईन अजूनही वेळ गेलेली नाहीये. पाठिंबा द्या आम्ही सगळं विसरतो. जर माघार घेतली नाही तर तुम्ही पार्टीमधून बाहेर असणार . तुमची पुढील कामे कशी होतात ते आम्ही बघतोच, असा समरजीत सिंह घाटगे यांनी इशारा दिलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.