Murlidhar Jadhav News Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur Political News : ठाकरे गटाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षांना रोखठोक भूमिका महागात पडली; पदावरुन तडकाफडकी हटवलं

Kolhapur Murlidhar Jadhav News : शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन आपण आपली बाजू मांडणार असल्याचं मुरलीधर जाधव यांनी साम टीव्हीला माहिती दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

रणजीत माजगावकर

Kolhapur News :

शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्यात मुंबईत भेट झाली. या भेटीवर कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख मुरलधीर जाधव यांना रोखठोक भूमिका घेणे महागात पडलं आहे. मुरलीधर जाधव यांना जिल्हाध्यक्ष पदावरून तडकाफडकी हटवण्यात आलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय म्हणाले होते मुरलीधर जाधव?

दोनच दिवसांपूर्वी राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर मुरलीधर जाधव यांनी राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीतून उमेदवारी देऊ नका अशी विनंती केली होत. राजू शेट्टी यांना उमेदवारी देण्यापेक्षा निष्ठावंताला उमेदवारी द्यावी, असं मत त्यांनी मांडलं होतं.

मात्र या मागणीनंतर मुरलीधर जाधव यांच्यावर ही कडक कारवाई करण्यात आली आहे. उद्या पत्रकार परिषद घेऊन आपण आपली बाजू मांडणार असल्याचं मुरलीधर जाधव यांनी साम टीव्हीला माहिती दिली आहे.  (Political News)

काय म्हणाले होते मुरलीधर जाधव?

मुरलीधर जाधव यांनी माध्यमांसमोर येत उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टी यांच्या भेटीबाबत संताप व्यक्त केली. राजू शेट्टी हे बेभरवशाचे आहेत. त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. राजू शेट्टी यांना शिवसेनेतून हातकणंगले मतदारसंघासाठी उमेदवारी देऊ नका, असं मुरलीधर जाधव यांनी म्हटलं.

२०१४ साली राजू शेट्टी यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली. राजू शेट्टींना कधीही जवळ करु नका. माझा विचार नाही केली तरी चालेल, पण निष्ठावंत शिवसैनिकाला संधी द्या. पक्ष फुटल तरी आम्ही तुमच्यासोबत राहिलो, अशी मागणी मुरलीधर जाधव यांची उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

खासदार असताना राजू शेट्टी यांनी शिवसैनिकांना कोणतीही मदत केलेली नाही, असं म्हणत मुरलीधर जाधव यांनी राजू शेट्टींवर निशाणा साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यात मोठी खळबळ! तब्बल 70 टक्क्यांहून अधिक मंत्र्यांचा गेम होणार? कुणाला मिळणार संधी?

Ravindra Chavan : मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी आधी इतिहासात डोकवावं, रवींद्र चव्हाणांचा घणाघात

Maharashtra Live News Update : थोड्याच वेळात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होणार

Crime: दारू पाजली, नंतर मफलरने गळा आवळा; शिर धडावेगळं केलं अन्...; महिलेने बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याला संपवलं

ऐन निवडणुकीत हायव्होल्टेज ड्रामा; शिंदे गट-भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीला नवं वळण, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT