काेल्हापूर : गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना साता-यात आज (बुधवार जामीन मंजूर झाला असला तरी त्यांच्यावर साेलापूरात एका प्रकरणात आजच गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान मराठा समाजा विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गिरगाव न्यायालयाने (girgoan court) सदावर्तेंना काेल्हापूर पाेलिसांच्या (kolhapur police) ताब्यात दिले आहे. (Gunratna Sadavarte Latest Marathi Update)
सदावर्ते यांच्यावर कोल्हापुरातील शाहूपुरी पोलिसात (shahupuri police) कलम १५३ नूसार गुन्हा दाखल आहे. दोन समाजात तेढ निर्माण होईल तसेच एकोप्याला बाधा येईल अशी कृती केल्याचे तक्रार मराठा क्रांती मोर्चाचे (maratha kranti morcha) दिलीप पाटील यांनी केली हाेती.
त्यानूसार सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मराठा आरक्षण (maratha reservation) विरोधी न्यायालयीन लढा लढण्यासाठी सदावर्तेंनी बेकायदेशीरपणे पैसे जमवले तसेच उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीचा अवमान केल्याचे देखील तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. उद्या (गुरुवार) सदावर्तेंनी काेल्हापूरातील न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी हाेणार असल्याचे सांगितले जात हाेते. त्यापुर्वीच आज (बुधवार) त्यांना मुंबईतून काेल्हापूर पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.