Patient end his life Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur News : रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरुन उडी घेत तरुणाने संपवलं जीवन; कोल्हापुरातील धक्कादायक घटना

Patient end his life jumping from Chhatrapati Government Hospital : कोल्हापूरमध्ये एका रूग्णाने आत्महत्या केलीय. ही घटना कोल्हापुरातील छत्रपती शासकीय रुग्णालयात घडली.

Rohini Gudaghe

रणजीत माजगांवकर, साम टीव्ही कोल्हापूर

कोल्हापूरमधील छत्रपती शासकीय रुग्णालयात एक धक्कादायक घटना समोर आलीय. एका रूग्णाने रूग्णालयाच्या इमारतीवरून उडी मारून जीवन संपवलं. या घटनेमुळे रूग्णालयात मोठी खळबळ उडाली होती. कर्मचारी, डॉक्टर आणि इतर रूग्णांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली (Kolhapur News) होती.

रूग्णालयाच्या इमारतीवरून उडी मारली

याबाबत सविस्तर वृत्त असं की, कोल्हापुरातील छत्रपती शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी साताप्पा लोहार नावाचा रूग्ण पंधरा दिवसांपूर्वी दाखल झाला होता. त्याने विषारी द्रव प्राशन केल्यामुळे त्याची प्रकृती गंभीर (patient end his life) होती. सुमारे पंधरा दिवसांच्या उपचारानंतर त्याची प्रकृती ठीक झाली होती. त्यामुळे त्याला आज घरी सोडण्यात येणार होतं.

कोल्हापूरमधील छत्रपती शासकीय रुग्णालयातील घटना

कोल्हापुरातील छत्रपती शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल असणाऱ्या रुग्णाने काल १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. साताप्पा लोहार, असं मृत रुग्णाचं नाव (Chhatrapati Government Hospital) आहे. साताप्पा लोहार याने विषारी द्रव पिल्यामुळे तो पंधरा दिवसांपासून सीपीआरमध्ये उपचार घेत होता. प्रकृती सुधारल्याने आज त्याला डिस्चार्ज देण्यात येणार होता.

टोकाचं पाऊल का उचललं?

दरम्यान काल सायंकाळी अचानक त्याने रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला आणि रात्री त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत (Kolhapur Hospital) आहे. साताप्पाने असं टोकाचं पाऊल का उचललं? हे अजून गुलदस्त्यात आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहे. सध्या रूग्णालयातील परिस्थिती शांत असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Calcium Deficiency: शरीरात कॅल्शियम कमी असल्यास कोणती गंभीर लक्षणे दिसतात? जाणून घ्या

Thackeray Shivsena News : ठाकरेंच्या शिवसेना नेत्याला जीवे मारण्याची धमकी, गुंडाच्या त्या कृत्यामुळे कल्याणमध्ये संताप, वाचा नेमकं काय घडलं?

Shrutz Haasan Photos: कपाळी टिकली अन् कातील नजर, साऊथच्या अभिनेत्रीने केले तरूणांना घायाळ

पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला खिंडार; बड्या नेत्याची भाजपच्या दिशेनं वाटचाल, राजकारण तापलं

Ahilyanagar Crime : धक्कादायक! खोटे रिपोर्ट बनवून चुकीचे उपचार; मृत्यूनंतर अवयवांची तस्करी, ६ डॉक्टरांवर गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT