Kolhapur News  Saam Digital
महाराष्ट्र

Kolhapur News : विजेच्या धक्क्याने पोटच्या दोन्ही मुलांचा मृत्यू; ५ दिवस पाण्याचा थेंबही घेतला नाही...मुलांच्या विरहाने माऊलीनेही सोडले प्राण

साम टिव्ही ब्युरो

रंजित माजगावकर

कोल्हापूर जिल्ह्यातील कोपर्डे येथील स्वप्नील कृष्णा पाटील आणि सुहास कृष्णा पाटील हे दोघं सख्खे भाऊ 3 जुलै रोजी शिवारात गेले होते. शिवारात काम करत असताना विद्युत तारेचा स्पर्श होऊन या दोघा तुरुणांचा मृत्यू झाला होता. महावितरणच्या गलथान कारभाराचे ते बळी ठरले आहेत. आपल्या दोन्ही तरुण मुलांचा मृत्यूच्या घटनेचा त्यांची आई नंदाताई कृष्णा पाटील यांना बसला. पोटच्या दोन्ही मुलांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्यामुळे या धक्क्यातून त्यांना सावरता आलं नाही आणि आज त्यांनी आपल्या लेकरांसाठी अखेरचा श्वास घेतला. संपूर्ण जिल्ह्यात या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

पोटची दोन्ही मुलं अगदी ऐन तारुण्यात आलेली, कमावती गतप्राण झाली. आणि हा धक्का आई नंदाताई आणि वडील कृष्णा पाटील यांना बसला. त्यांनी गेले पाच दिवस तोंडात पाण्याचा थेंब ही घेतला नाही. आई नंदाताई यांनी काल अखेरचा श्वास घेतला. या दुर्दैवी घटनेने कोपर्डे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

5 दिवसांपूर्वी कोपार्डे गावात सायंकाळी 4 च्या सुमारास कृष्णा आणि स्वप्नील शिवारात कामासाठी गेले होते. शेतात काम करत असताना चुकून विद्युत खांबाला त्यांचा स्पर्श झाला आणि त्यांना विजेचा धक्का बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि ग्रामस्थांनी शिवारात धाव घेतली. मात्र, तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता. घराती दोन्ही करती सवरत्या मुलं गेल्यामुळे पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे तुतारी फुंकणार? आधी भाजप आता दादांची कोंडी? शरद पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Cancer Detection Test : आता 1 मिनिटात कॅन्सरचं निदान होणार; IIT कानपूरनं बनवलं कॅन्सर डिव्हाईस, पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

SCROLL FOR NEXT