kolhapur news lovers ended her life in Hatkanangale as families against their relationship Saam TV
महाराष्ट्र

Kolhapur News: ...अन्यथा प्रेम करू नका, मोबाइलवर स्टेटस ठेवत प्रेमीयुगुलाने संपवलं जीवन; मन सुन्न करणारी घटना

Kolhapur News Live: सोशल मीडियावर स्टेटस ठेवत एका प्रेमीयुगुलाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Satish Daud

रणजित मांजगावकर, साम टीव्ही

Kolhapur Latest News: कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर स्टेटस ठेवत एका प्रेमीयुगुलाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे.

आत्महत्या केलेल्या तरुणाचं वय १८ वर्ष, तर तरुणीचे वय १६ वर्ष असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी धाव घेत प्रेमीयुगुलाचे मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात पाठवले आहे. (Latest Marathi News)

या घटनेनंतर सीपीआर रुग्णालयात दोघांच्याही नातेवाईकांनी गर्दी केली होती. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, हातकणंगले (Kolhapur News) तालुक्यातील शिरोली पुलाची इथे राहणाऱ्या एका १८ वर्षीय तरुणाचं परिसरातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर प्रेम होतं.

मात्र, दोघांची जात वेगळी असल्याने त्यांच्या प्रेमसंबंधाला दोघांच्याही कुटुंबीयांचा विरोध होता. या विरोधाच्या नैराश्यातूनच त्यांनी आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. शनिवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास तरुणासह अल्पवयीन मुलीने नायलॉनच्या दोरीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.

"प्रेम करताना जात धर्म बघू नका, ज्याच्यावर प्रेम करता त्याच्यासोबत मरायलाही तयार व्हा, अन्यथा प्रेम करू नका", असं स्टेटस ठेवत दोघांनीही एकाच वेळी गळफास घेतला. दरम्यान, तरुणाच्या नातेवाईकांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने दोघांनाही रुग्णालयात दाखल केले.

मात्र, रुग्णालयात जाण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. प्रेमसंबधातून अल्पवयीन प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची घटना शहरात वाऱ्यासारखी पसरली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले. या घटनेनंतर सीपीआर रुग्णालयात दोघांच्याही नातेवाईकांनी गर्दी केली होती.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: ठाणे-सीएसएमटी लोकल बंद

Majalgaon Dam : माजलगाव धरण ५६ टक्के भरले; बीडसह माजलगावची पाण्याची चिंता मिटली

EPFO: पीएफचे पैसे कधी आणि कसे काढू शकतात? EPFO चा नियम काय सांगतो

Mumbai Crying Club: मुंबईमध्ये सुरु झाला पहिला 'क्रायिंग क्लब'; तणावापासून मुक्तता मिळवण्यासाठी घेतली जाते जपानच्या प्रथेची मदत

Mumbai Rain : पावसाचा हाहा:कार! मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, एलबीएस मार्ग बंद, कुर्लामध्ये कमरेइतके पाणी; धडकी भरवणारा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT