Thane News: आधी पत्नीची गोळी झाडून हत्या, नंतर स्वत:लाही संपवलं; बांधकाम व्यावसायिकाने उचललं टोकाचं पाऊल

Thane Crime News: बांधकाम व्यावसायिक दिलीप साळवी यांनी पत्नी प्रमिला साळवी हिच्यावर गोळी झाडून तिची हत्या केली. त्यानंतर स्वत:वरही गोळी झाडत आपली जीवनयात्रा संपवली.
Thane News builder Dilip Salvi killed his wife pramila and ended his life journey
Thane News builder Dilip Salvi killed his wife pramila and ended his life journeySaam TV
Published On

Husband Killed Wife in Thane: ठाणे शहरातील कळवा परिसरातून एक भयानक घटना समोर आली आहे. बांधकाम व्यावसायिक दिलीप साळवी यांनी पत्नी प्रमिला साळवी हिच्यावर गोळी झाडून तिची हत्या केली. त्यानंतर स्वत:वरही गोळी झाडत आपली जीवनयात्रा संपवली. ही थरारक घटना शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनं मोठी हळहळ व्यक्त होत आहे. (Latest Marathi News)

Thane News builder Dilip Salvi killed his wife pramila and ended his life journey
Mumbai News: मुंबईत पॅराग्लाईडर्स, पॅरा मोटर्स, मायक्रोलाईट एअर क्राफ्ट, ड्रोनच्या वापरावर १६ सप्टेंबरपर्यंत बंदी

गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच ठाण्याचे अतिरिक्त पोलीस (Police) आयुक्त महेश पाटील, उपायुक्त गणेश गावडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात आदींनी धाव घेतली. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहे.

बांधकाम व्यावसायिक दिलीप साळवी हे ठाण्याचे माजी महापौर गणेश साळवी यांचे मोठे बंधू असल्याची माहिती आहे. खुनाचे हे थरारनाट्य कळव्यातील (Thane News) मनीषानगरातील कुंभारआळीतील साळवी यांच्या घरात घडलं आहे. हत्या आणि आत्महत्येचे नेमकी कारण अजून समजू शकले नाही.

Thane News builder Dilip Salvi killed his wife pramila and ended his life journey
Sharad Pawar News: महाराष्ट्रात सध्या फक्त आणि फक्त हुकूमशाही; जालन्यातील घटनेवरून शरद पवारांची शिंदे सरकारवर टीका

मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप साळवी आणि त्यांच्या पत्नी प्रमिला यांच्यात काही कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला, की दिलीप साळवी यांनी पत्नी प्रमिला यांची गोळी झाडून हत्या केली. हत्येनंतर त्यांनी स्वत:वर गोळी झाडत आपली जीवनयात्रा संपवली.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. दिलीप आणि प्रमिला दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविण्यात आल्याचे कळवा पोलिसांनी सांगितले. या घटनेनं शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com