रणजीत माजगावकर
कोल्हापूर : दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाच्या मूळ मूर्तीवर आजपासून रासायनिक संवर्धन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. केंद्रीय पुरातत्व विभागाने आजपासून सुरू केलेल्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेमुळे मूळ मूर्तीचे दर्शन 4 दिवस बंद राहणार आहे. तर उत्सव मूर्तीचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या वाडी रत्नागिरीचा प्रसिद्ध असणारा देव अर्थात दख्खनचा राजा श्री ज्योतिबा. ज्योतिबाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रच नव्हे तर कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा आणि गुजरात राज्यातून लाखो भाविक दाखल होत असतात. यातच ज्योतिबाची यात्रा म्हटली तर लाखो भाविक गुलाल खोबऱ्याची उधळण करत आणि ज्योतिबाच्या गजर करत गडावरती दाखल होतात. आता याच ज्योतिबाच्या मूळ मूर्तीचा भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वतीने आजपासून रासायनिक संवर्धन प्रक्रिया सुरू केली आहे.
मूळ मूर्तीचे दर्शन राहणार बंद
जोतिबाची मूळ मूर्ती सुस्थितीत राहण्याच्या अनुषंगाने मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने घेतला आहे. मूर्तीची झीज झाल्यामुळे तिच्यावरती रासायनिक संवर्धन प्रक्रिया होते. त्यामुळे मूर्ती सूचित राहील असं भाविक सांगतात. या निर्णयानुसार आजपासून २४ जानेवारीपर्यंत ही संवर्धन प्रक्रिया सुरू राहणार आहे. यावेळेत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मूळ मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही.
दर्शनासाठी उत्सव मूर्ती व कलश
रासायनिक संवर्धन प्रक्रिया सुरू असताना भाविकांना कोणताही त्रास होऊ नये; म्हणून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने ज्योतिबा मंदिराच्या आवारातच उत्सव मूर्ती आणि कलश दर्शनासाठी ठेवला आहे. उत्सव मूर्तीचे दर्शन हे कासव चौकात घेता येणार आहे. भाविक रांगेत उभे राहून व्यवस्थित उत्सव मूर्तीचे दर्शन घेत आहेत. आजही मोठ्या संख्येने भाविक जोतिबा डोंगरावरती दाखल झाले.
दरम्यान दख्खनचा राजा ज्योतिबाच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी १९३६ साली जोतिबाची मूर्तीच्या स्वरूपात होती. त्याच स्वरूपात संवर्धन होणे आवश्यक असल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले. देवाच्या मूर्तीची विटंबना होता कामा नये, तसेच देवाच्या रूपात बदल होता कामा नये असा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.