Panchganga Flood Saam tv
महाराष्ट्र

Panchganga Flood : कोल्हापुरात मुसळधार; पंचगंगेची वाटचाल इशारा पातळीकडे, ७७ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे. राधानगरी धरणाचे सातही दरवाजे उघडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत असल्याने पंचगंगेसह सर्वच नद्या या दुथडी भरून वाहत आहेत

Rajesh Sonwane

रणजित माजगावकर 
कोल्हापूर
: गेल्या तीन दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाचा जोर कायम असल्याने पंचगंगा नदीला मोठा पूर आला असून नदीच्या पुराची वाटचाल संथ गतीने इशारा पातळीकडे सुरू आहे. इतकेच नाही तर ७७ बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे त्याठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु असल्याने जिल्ह्यातील जवळपास सर्वच नद्यांना पूर आला आहे. यात पंचगंगा नदीला देखील मोठा पूर आला असल्याने नदीतील पाणी पातळी इशारा पातळीकडे जात आहे. तर कोल्हापूरहून कोकणाकडे जाणारा मार्ग अर्थात सिंधुदुर्ग- रत्नागिरीकडे जाणारी वाहतूक पूर्णतः कोलमडली आहे. पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे कोकणाकडे जाणारी आणि येणारी दोन्ही बाजूकडील वाहतूक बंद केली आहे. तर राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत असल्याने पंचगंगेसह सर्वच नद्या या दुथडी भरून वाहत आहेत.

पुराच्या पाण्याचा जलसंपदा विभागाकडून बोटीतून सर्वे
गेल्या तीन दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे सुरू आहे. सध्या राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाकडून पंचगंगेच्या पाण्याचा प्रवाह, पाण्याची खोली आणि पडणारा पाऊस याचा सर्वे केला जात आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा परिसरात जलसंपदा विभागाच्या चार अधिकाऱ्यांनी अत्याधुनिक यंत्रसामुग्रीसह बोटीतून सर्वे केला जात आहे. 

तरुणाला काढले सुखरूप बाहेर 

फिट येऊन बेशुद्ध पडलेल्या तरुणाला जिल्हा आपत्ती पथकाने बोटीतून रुग्णवाहिकेपर्यंत सुखरूप पोहचवले. कुंभी नदीला पूर आल्याने पन्हाळा तालुक्यातील गोटे गावातल्या शशांक नाईक याला उपचारासाठी घेऊन जाणे अशक्य बनले होते. मात्र तत्काळ बोटीद्वारे त्याला प्रवाहाच्या दुसऱ्या बाजूला आणण्यात आले तेथून रुग्णवाहिकेतून त्याला पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Early signs of brain cancer: सततची डोकेदुखी होत असेल तर असू शकतो ब्रेन कॅन्सर; मेंदू देत असलेले संकेत ओळखा

Sonalee Kulkarni: हॉट अन् बोल्ड सोनाली कुलकर्णी, लेटेस्ट फोटोंनी उडवली झोप

Shocking : खिशात पैसा नाही, मुलांसाठी दिवाळीत कपडे अन् फराळ कुठून आणू?, चिंतेतून शेतकऱ्याने संपवलं आयुष्य

Virat Kohli: विराट पुन्हा शून्यावर आऊट; एडिलेड वनडेनंतर घेणार निवृत्ती? विकेटनंतर क्राऊडला केलेल्या इशाऱ्यामुळे चर्चांना उधाण

BSNL कडून ज्येष्ठ नागरिकांसाठी "सम्मान प्लॅन" लाँच, वर्षभरासाठी दररोज २ जीबी डेटा आणि कॉलिंग; किंमत किती?

SCROLL FOR NEXT