Marathwada Rain : मराठवाड्यातील पाण्याची चिंता मिटली; प्रमुख ११ धरणाची शंभरीकडे वाटचाल

Sambhajinagar News : राज्यात जोरदार पाऊस पडत असून मराठवाड्यात देखील चार दिवसांपासून पाऊस पडत आहे. यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे
Marathwada Rain
Marathwada RainSaam tv
Published On

छत्रपती संभाजीनगर : सलग चार दिवसाच्या जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे मराठवाड्यातील जवळपास सर्वच मोठ्या धरण व प्रकल्पातील पाणीसाठा शंभरीकडे वाटचाल करीत आहे. तर पेनगंगा व मानार हे दोन प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. यामुळे मराठवाड्यातील पाण्याची चिंता मिटली आहे. 

राज्यात सर्वदूर पाऊस सक्रिय झाला आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस होत आहे. तर आगामी काही दिवसात अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान मराठवाड्यात आँरेज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाकडून दिलेल्या इशाऱ्यानुसार आज (१८ ऑगस्ट) छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व लातूर जिल्ह्यांना आँरेज अलर्ट तर परभणी, हिंगोली, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Marathwada Rain
Majalgaon Dam : माजलगाव धरण ५६ टक्के भरले; बीडसह माजलगावची पाण्याची चिंता मिटली

११ धरण प्रकल्पातील पाणीसाठा ९० टक्क्यांच्या वर 

सध्या मराठवाड्यातल्या ११ मोठ्या धरण प्रकल्पातील पाणीसाठा हा ९०.३ टक्के म्हणजे २२८.२९ टीएमसी इतका झाला आहे. यात जायकवाडी, येलदरी, सिद्धेश्वर, मांजरा, निम्न तेरणा या धरणातील पाणीसाठा हा शंभरीजवळ पोहोचलेला आहे. तर पेनगंगा, मानार या दोन प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यापाठोपाठ सिना कोळेगाव, विष्णुपुरी, माजलगाव, निम्न दुधना प्रकल्पात पाणीसाठा झपाट्याने वाढू लागला आहे. 

Marathwada Rain
Godavari River Flood : गोदावरी नदीला पूर; गंगामसला गावात पुराचे पाणी, मोरेश्वर मंदिर पाण्याखाली

धरणातील आत्ताची स्थिती
मराठवाड्यातील जायकवाडी धरणात ९४.८३ टक्के, येलदरी ९३.८३ टक्के, सिद्धेश्वर प्रकल्प ९५.३५ टक्के, मांजरा ९३.२२ टक्के, निम्न तेरणा ९५.७१ टक्के, सीना कोळेगाव ९०.१५ टक्के, पेनगंगा आणि मानार प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा. तर निम्न जुना ७३.५४ टक्के, विष्णुपुरी ४९.४९, माजलगाव ५५.८३ टक्के पाणीसाठा झाला आहे. सध्या आवक सुरू असल्यामुळे आणि काही ठिकाणी पाऊस सुरू असल्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com