Kolhapur News Saam Digital
महाराष्ट्र

Kolhapur News : जत्रेसाठी आलेल्या पाहुण्यांवर काळाचा घाला; वेदगंगा नदीत बुडून चौघांचा मृत्यू

Kolhapur News Update : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील आणूर येथून ह्रदयद्रावक घटना घडली आहे. वेदगंगा नदीत बुडून चौघांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृत सर्वजण आणूर गावाच्या यात्रेसाठी पाहुण्यांच्या घरी आले होते.

Sandeep Gawade

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील आणूर येथून ह्रदयद्रावक घटना घडली आहे. वेदगंगा नदीत बुडून चौघांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृत सर्वजण आणूर गावाच्या यात्रेसाठी पाहुण्यांच्या घरी आले होते. दरम्यान आज नदीवर धुणे धुण्यासाठी गेल्यानंतर त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. तिघांचे मृतदेह शोधण्यात यश आलं असून एका मुलाचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. ऐन जत्रेत घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

जितेंद्र विलास लोकरे (वय ३६, मुरगूड), रेश्मा दिलीप येळमल्ले (वय ३४, अथणी, कर्नाटक), सविता अमर कांबळे (वय २७ रुकडी), यश दिलीप येळमल्ले (वय १७, अथणी, कर्नाटक) अशी मृ्तांची नावं आहेत. याची माहिती ग्रामस्थांना कळताच ग्रामस्थांनी त्वरित नदीवर धाव घेतली आणि मृतदेह शोधण्याचं काम सुरू केलं. यावेळी दोन महिला आणि एकाचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात यश आलं. मात्र यशचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. त्याचा गावकऱ्यांकडून शोध मोहीम सुरू आहे.

मृतदेह सापडत नसल्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाच्या रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून सर्व मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाह रं पठ्ठ्या! ट्रेनच्या सीटवर झोपला; थंड हवेसाठी डोक्याच्या शेजारी कुलर ठेवला, देसी जुगाड पाहून सगळेच थक्क

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Maharashtra Live News Update: दारूच्या नशेत पतीने जंगलात नेऊन पत्नीचा गळा दाबला - गडचिरोली

Most Expensive School: १ कोटी रुपये फी अन् शाही थाट, 'ही' आहे जगातील सर्वात महागडी शाळा

लालबाग परिसरात भयंकर अपघात, २ मुलांना भरधाव वाहनानं चिरडलं; चिमुकलीचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT