Kolhapur News Saam tv
महाराष्ट्र

Kolhapur News : आर्थिक फसवणुकीमुळे दांपत्याचे टोकाचे पाऊल; चार महिन्यापूर्वीच अडकले होते विवाह बंधनात

KOlhapur News आर्थिक फसवणुकीमुळे दांपत्याचे टोकाचे पाऊल; चार महिन्यापूर्वीच अडकले होते विवाह बंधनात

Rajesh Sonwane

रणजीत माजगावकर

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील व्हाणगुत्ती इथल्या दांपत्याने करवीर तालुक्यातील इस्पुर्ली गावच्या हद्दीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हि आत्महत्या आर्थिक फसवणुकीतून (Kolhapur) झाल्याची माहिती समोर आली आहे. (Live Marathi News)

व्हाणगुत्ती येथील राहुल राजाराम परीट (वय २३) व अनुष्का राहुल परीट (वय २१) असे आत्महत्या केलेल्या दांपत्याचे नाव आहे. राहुल परीट यांचा चार महिन्यापूर्वी विवाह झाला होता. राहुल व पत्नी अनुष्का हे वाळवे येथे पाहुण्याच्या घरी जातो; असे सांगून गेले होते. वेळेत घरी राहुल आला का नाही? म्हणून नातेवाईकांनी फोन लावला असता संपर्क होऊ शकला नाही. राहुलच्या मोबाईलच्या लोकेशन नुसार त्याचे लोकेशन एका शेडमध्ये दिसत होते. कोल्हापूर गारगोटी मार्गावर असणाऱ्या एका शेडमध्ये हे लोकेशन दिसत होते. 

शेडमध्ये दिसले दाम्पत्य 

लोकेशनवरून नातेवाईक त्याठिकाणी पोहचले. यावेळी आतून शेडचा दरवाजा बंद होता. दरवाजा तोडून आत पाहिले असता राहुल आणि अनुष्का या दोघांनी गळफास लावल्याचे दिसलं. साडीच्या कपड्याने ओढणीने गळफास लावल्याचं दिसून आले. नातेवाईकांनी इस्पुर्ली पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. राहुल आणि अनुष्काने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. काल रात्री उशिरा हा प्रकार उघडकीस आलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : धक्क्कादायक! बहिणीसोबत तरुणाचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, अपहरण केलं अन्...

Blood sugar control: डायबिटीजमध्ये 3 छोट्या चुका पडू शकतात महागात; ब्लड शुगर वाढू नये यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Maharashtra News Live Update: धरण भरलं, पण जळगाव तहानलेलंच! हतनूरचं लाखो लिटर पाणी समुद्रात

DA Hike: सरकारी कर्मचारी अन् पेन्शनधारकांची लॉटरी! महागाई भत्त्यात मोठी वाढ; पाहा किती वाढणार पगार?

Moving car safety: धावत्या गाडीत सीट बदलणं का धोकादायक? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT