Kolhapur Nagarpalika Election Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur Nagarpalika Election: कोल्हापूरमध्ये कुणाचा नगराध्यक्ष? कागल ते गडहिंग्लजपर्यंत १३ पालिकांचे निकाल हाती; वाचा विजयी उमेदवारांची लिस्ट

Kolhapur Nagarpalika Election Result 2025: कोल्हापूर नगरपरिषद आणि नगरपंचायतीचा निकाल जाहीर झाला आहे. कोल्हापूरमध्ये १३ नगरपालिका आणि ३ नगरपंचायतीवर कोणाची सल्ला आली ते जाणून घ्या.

Siddhi Hande

कोल्हापूर नगरपालिका आणि नगरपंचायतीचा निकाल जाहीर

१३ नगरपालिका आणि ३ नगरपंचायतीत कोणाचा विजय?

विजयी उमेदवारांची यादी वाचा

राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूकीचा निकाल लागला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास १० नगरपालिका आणि ३ नगरपंचातीसाठी निवडणुका झाल्या होत्या. दरम्यान, यामध्ये मुरगूड, जयसिंगपूर, हातकणंगले आणि कुरुंदवाडमध्ये शिंदे सेनेने विजय मिळवला तर काँग्रेसने पेठवडगाव आणि शिरोळमध्ये यश मिळवलं. अजित पवार गटाला कागल आणि चंदगडमध्ये विजय मिळाला आहे.

कोल्हापूरमध्ये कोणाचं वर्चस्व? (Kolhapur Nagarpanchayat and Nagarpalika Election Result)

कागल नगरपरिषद (Kagal)

कागल नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सविता भैय्या या नगराध्यक्ष झाल्या आहेत. त्यांनी शिवसेनेच्या युंगेंधरा घाटगे यांचा पराभव केला.

गडहिंग्लज

गडहिंग्लज नगरपरिषदेत राष्ट्रवादीचे महेश महादेव तुरबमठ यांनी यश मिळवला. त्यांनी महाआघाडीचे गंगाधर राजशेखर हिरेमठ यांचा पराभव केला.

चंदगड नगरपंचायत

चंदगडमध्ये सुनिल कानेकर हे नगराध्यक्ष झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार दयानंद काणेकर यांचा पराभव केला.

शिरोळ

शिरोळमध्ये शिव शाहू यादव पॅनलच्या योगिता कांबळे या विजयी झाल्या आहेत. त्यांनी आमदार अशोकराव माने यांच्या सुनबाई सारिका माने यांचा पराभव केला.शिरोळचे सध्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या उमेदवार श्वेता काळे यांचाही पराभव केला.

कुरुंदवाड नगरपरिषद

कुरुंदवाड नगरपरिषद निवडणुकीत शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यांच्या राजर्षी शाहू आघाडीच्या मनीषा डांगे विजयी झाल्या आहेत.

पन्हाळा

पन्हाळा नगरपरिषद निवडणुकीत जनसुराज्य पक्षाच्या जयश्री पवार विजयी झाल्या आहेत. त्यांनी तिन्ही अपक्ष उमेदवारांचा पराभव केला.

मलकापूर

मलकापूर नगरपरिषद निवडणूकीत जनसुराज्य आणि भाजपच्या उमेदवार रश्मी कोठवळे यांनी यश मिळवले आहे.

पेठवडगाव नगरपरिषद

पेठवडगाव नगरपरिषद निवडणुकीने यादव आघाडीच्या विद्या पोल नगराध्यक्ष पदावर निवडून आल्या आहेत.

जयसिंगपूर नगरपरिषद

जयसिंगपूर नगरपरिषद येथे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील यांचा विजय झाला आहे.

हुपरी नगरपरिषद

हुपरी नगरपरिषदेत भाजपचे मंगलराव माळगे यांनी विजय मिळवला आहे.

हातकणंगले

हातकणंगले नगरपंचायतीत शिवसेनेचे उमेदवार अजित पाटील यांचा विजय झाला आहे.

मूरगूड नगरपंचायत

मुरगूड नगरपंचायतीत शिवसेनेच्या सुहासिनी प्रवीणसिंह पाटील यांनी विजय मिळवला आहे. या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफांना धक्का बसला आहे.

आजरा नगरपंचायत

आजरा नगरपंचायतीत ताराराणी आणि भाजप आघाडीचे अशोक चराटी विजयी झाले आहे. काँग्रेसच्या संजय सावंत यांचा पराभव झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkan Tourism : स्वच्छ वाळू, जलक्रीडा अन् मनमोहक सूर्यास्त, कोकणच्या कुशीत वसलंय 'हे' अद्भुत ठिकाण

मुंबईत भाजपचीच सत्ता, ४० वर्षानंतर मायानगरीवर राज्य करणार; महापौरपदासाठी कुणाची नावे आघाडीवर?

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यातील शिरूर आढळून आले तब्बल २ कोटी रुपयांचे अमली पदार्थ

Chanakya Niti: या 2 गोष्टींना घाबरणारे लोक आयुष्यात कधीच मिळवत नाहीत पैसा, सत्य वाचून बसेल धक्का

भारतीय वायूसेनेचं विमान थेट तलावात, भीषण स्फोट अन् धुराचे लोट; पाहा थरारक VIDEO

SCROLL FOR NEXT