Kolhapur Bribery case News  AI image
महाराष्ट्र

Bribe Case : कोल्हापुरात धक्कादायक प्रकार! सातबाऱ्यावर नाव लावण्यासाठी घेतली लाच; २ जण असे अडकले पोलिसांच्या जाळ्यात

Kolhapur Nagaon Bribe Case News : नागाव येथे सातबारा उताऱ्यावरील क्षेत्र दुरुस्ती आणि नाव नोंदणीसाठी १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

Alisha Khedekar

सातबारा उताऱ्यावरील जमिनीचे क्षेत्र दुरुस्त करून नावाची नोंद करण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच घेताना एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. नागाव येथे ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अवधूत रामचंद्र लोंढे आणि सूरज कुंतिनाथ सोळांकुरे अशी संशयितांची नावे आहेत. यातील लोंढे हा ग्राम महसूल अधिकारी कार्यालयातील खासगी उमेदवार, तर सोळांकुरे हा खासगी व्यक्ती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची नागाव येथे वडिलोपार्जित जमीन आहे. या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर क्षेत्राची चुकीची नोंद झाली होती. ही चूक दुरुस्त करून योग्य क्षेत्राची नोंद करावी आणि सातबारा उताऱ्यावर आपले नाव लावावे, यासाठी तक्रारदाराने हातकणंगले तहसील कार्यालयात अर्ज केला होता. पुढील प्रक्रियेसाठी हा अर्ज नागाव तलाठी कार्यालयाकडे पाठवण्यात आला.

तक्रारदाराने आवश्यक कागदपत्रे देऊन नाव नोंदवण्याबाबत विचारणा केली असता, तलाठ्यांनी त्यांना अवधूत लोंढे यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. त्यानंतर लोंढे यांनी काम करून देण्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी केली. यामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.

विभागाने तक्रारीची पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे समोर आले. याचदरम्यान सूरज सोळांकुरे यानेही तलाठ्यांच्या कार्यालयातील काम पूर्ण करून देण्याचे सांगत १२ हजार रुपये देण्याची मागणी केली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागाव येथे सापळा रचला. ठरल्याप्रमाणे सोळांकुरे याने तक्रारदाराकडून १२ हजार रुपये स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने त्याला पकडले. या प्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

जेवायला गेले अन् काळाचा घाला! सांगलीत दोन नर्सिंग विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत; वैद्यकीय क्षेत्रात हळहळ

Vastu Tips For Work From Home: तुम्हीही बेडवर बसून ऑफिसचे काम करताय? आत्ताच सोडा ही सवय, करिअर आणि प्रगतीवर होईल परिणाम

मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंच्या निकटवर्तीय नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, पुण्यात राजकीय घडामोड

Maharashtra News Live Update : सुप्रीम कोर्टात मुंबई महापालिकेची नामुष्की; भाजपचा अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, कारवाईचा इशारा

Aortic Stenosis : सततचा थकवा दुर्लक्षित करू नका! हार्टच्या 'या' भयंकर आजाराची असू शकतात लक्षणे

SCROLL FOR NEXT