Kolhapur Municipal Corporation Saam Digital
महाराष्ट्र

Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांसह तीन अधिकाऱ्यांच्या एकाचवेळी बदल्या; मोठं कारण आलं समोर

Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त केशव जाधव आणि रविकांत अडसूळ यांची बदली करण्यात आली आहे. उपायुक्त शिल्पा दरेकर यांचीही बदली झाल्याने महापालिकेतील एकाच वेळी तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

Sandeep Gawade

Kolhapur Municipal Corporation

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि पोलीस खात्यात मोठे बदल करण्यात आले आहेत. कोल्हापूर महापालिकेतही फेरबदल झाले आहेत. अतिरिक्त आयुक्त केशव जाधव आणि रविकांत अडसूळ यांची बदली करण्यात आली असून उपायुक्त शिल्पा दरेकर यांचीही बदली झाली आहे. महापालिकेतील एकाच वेळी तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. केशव जाधव रुजू होऊन अजून वर्षही झालेलं नव्हतं.

ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बंगार यांची BMC अतिरिक्त आयुक्तपदी बदली

एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातल्या वेगवेगळ्या पालिकांच्या उपायुक्त आणि अतिरिक्त आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. यातच ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बंगार यांची मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.अभिजीत बंगार यांची पी. वेलरासू यांच्या जागी बदली करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबत माहिती जाहीर केली आहे. अभिजीत बंगार यांना त्वरित पदाचा कार्य कार्यभार स्वीकारण्याचे शासनाकडून देण्यात आले आहेत.

 (साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बीएमसी आयुक्तपदी तीन नावांची चर्चा

दरम्यान, भारतीय निवडणूक आयोगाने बीएमसी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासह अनेक अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांच्या बदलीचे आदेश दिले होते. यानंतर आता बीएमसी आयुक्तपद रिक्त आहे. राज्य सरकारने मुंबई पालिका आयुक्त म्हणून तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या नावाची शिफारस निवडणूक आयोगाकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  (Latest Marathi News)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने आयएएस अधिकारी भूषण गगराणी, अनिल डिग्गीकर आणि संजय मुखर्जी यांचं नाव पाठवलं आहे. या तिघांपैकी एकाची वर्णी मुंबई पालिका आयुक्त म्हणून लागू शकते, अशी शक्यात वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जनतेच्या विश्वासाला न्याय देण्याचा प्रयत्न - सुनेत्रा पवार

8 व्या वेतन आयोगाआधी सरकारचं कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, होळीच्या आधी गुड न्यूज

ICC T20 WC: सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला किती सुपर८चे किती सामने जिंकावे लागतील? समजून घ्या संपूर्ण गणित

Sindhudurg Tourism : रुपेरी वाळू सोनेरी लाटा...; कोकणात 'येथे' घ्या रोमांचक जलक्रीडांचा अनुभव

राज्यात राजकीय घडामोडींना वेग; मुख्यमंत्र्यांनी तातडीने बोलावली मंत्रिमंडळाची बैठक, VIDEO

SCROLL FOR NEXT