Maharashtra Politics x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : मनसेला कोल्हापुरात झटका बसणार? जिल्हाध्यक्ष, माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर?

Maharashtra Political News : कोल्हापूरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला धक्का बसणार असल्याची चर्चा रंगली आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक भाजपमध्ये जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

Saam Tv

  • मनसेला कोल्हापूरात झटका बसणार असल्याची शक्यता

  • मनसेचे जिल्हाध्यक्ष भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा

  • काही गोष्टींमुळे पक्षप्रवेशाचा निर्णय लांबणीवर

Maharashtra : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग आणि आउटगोईंग सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आगामी निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कोल्हापूरात धक्का बसू शकतो अशी सध्या चर्चा रंगली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव नगरसेवक आणि जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले हे भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याचे म्हटले जात आहे. पक्षप्रवेशाबाबत प्राथमिक स्तरावरील बैठका झाल्या आहेत. अटी आणि नियम यांच्यामुळे राजू दिंडोर्ले यांचा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय लांबणीवर पडल्याचे म्हटले जात आहे.

कोल्हापुरातील प्रभागात प्रमुख दावेदार म्हणून राजू दिंडोर्ले यांच्याकडे पाहिले जात आहे. महायुतीकडून निवडणूक लढवण्यास झालेल्या प्रभागात त्यांची ताकद असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे राजू दिंडोर्ले यांना महायुतीच्या भारतीय जनता पक्षात घेण्याचे प्रयत्न सुरु आहे, असे बोलले जात आहे. याबाबत भाजपमध्ये प्राथमिक स्तरावर चर्चा झाल्याचेही म्हटले जात आहे.

राजू दिंडोर्ले हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर पडून भारतीय जनता पक्षात जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. पण यावर भाजप किंवा मनसेच्या कोणत्याही नेत्याकडून किंवा पदाधिकाऱ्याकडून अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही. या चर्चा सुरु असताना राजू दिंडोर्ले यांच्याशी संपर्क साधण्यात आला. तेव्हा सरकारनामाशी बोलताना त्यांनी 'मी कोणत्याच पक्षात जाणार नसून मनसेकडूनच निवडणूक लढवणार आहे', असे स्पष्टीकरण दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : धक्कादायक! तोंडात कापड कोंबलं, स्टेजवरून उचललं; निर्जनस्थळी नेत नर्तकीवर सामुहिक अत्याचार

Sunday Horoscope: व्यावसायिकांसाठी रविवार ठरणार धनवार;5 राशींचं नशिब फळफळणार!

Shocking: अंगाई गीत गायलं, मांडीवर झोपवलं नंतर...; आईनेच घेतला पोटच्या चिमुकलीचा जीव

Virar-Vasai Tourism : विरार-वसईजवळील अथांग समुद्रकिनारा, फार कमी लोकांना माहितेय 'हे' सुंदर लोकेशन

Soft Chapati : डब्यात ठेवलेली चपाती ओली होतेय? मग या सोप्या टिप्स वापराच

SCROLL FOR NEXT