Kolhapur Crime News  AI Image
महाराष्ट्र

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Kolhapur Crime News : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची धारदार शस्त्राने वार करून हत्या. मंदिर परिसरातील घटनेनंतर पोलिसांकडून तपास सुरू.

Alisha Khedekar

  • कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव येथे १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची हत्या

  • १७ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास घटना घडली

  • मंदिर परिसरात मुलीवर धारदार शस्त्राने हल्ला

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १७ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास सांस्कृतिक भवनासमोरील मंदिर परिसरात हा प्रकार घडला. या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली असून, हल्ल्यानंतर पसार झालेल्या संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगी नववीच्या वर्गात शिक्षण घेत होती. शनिवारी रात्री ती माणगाव येथील मंदिर परिसरात असताना तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. संशयिताने मुलीच्या गळ्यावर वार केला, तर तिच्या दंडालाही गंभीर दुखापत झाली. या हल्ल्यात ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. घटनेची माहिती मिळताच तिला तातडीने इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले.

दरम्यान, या घटनेनंतर परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्ला केल्यानंतर संशयित तरुण घटनास्थळावरून पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. तो पळून जात असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांकडून उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयिताची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हातकणंगले पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गुन्ह्याशी संबंधित पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले, तर संशयिताचा माग काढण्यासाठी श्वान पथकाची मदत घेण्यात आली. परिसरातील परिस्थिती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून तपास केला जात आहे. अल्पवयीन मुलीच्या हत्येमुळे माणगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संशयिताला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू ठेवली असून, या प्रकरणातील पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT