रणजित माजगावकर, साम टीव्ही प्रतिनिधी
Kolhapur News Update : एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी घटना कोल्हापूरच्या कसबा बावडा या ठिकाणी घडली आहे. कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरात राहणाऱ्या पांडुरंग उलपे यांना चक्क एका स्पीड ब्रेकर मुळेच पुनर्जन्म मिळाला आहे. 16 डिसेंबर रोजी सायंकाळी 65 वर्षीय पांडुरंग उलपे यांना अचानक चक्कर आली आणि ते घरातच कोसळले. यावेळी नातेवाईकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी घेऊन गेले. मात्र डॉक्टरांनी ते मयत झाल्याचे घोषित केलं. नातेवाईकांनी पांडुरंग तात्यांना अंत्यसंस्कारासाठी घरी घेऊन जाऊ लागले. याचवेळी कसबा बावडा परिसरात ॲम्बुलन्स एका स्पीड बेकरवर आदळली आणि याचा झटका लागून पांडुरंग तात्या यांच्या हातांची बोटे हळू लागली. आणि तात्यांना जणू जीवदानच मिळालं. कोल्हापूरमध्ये पांडुरंग उलपे यांची चर्चा होत आहे.
पांडुरंग उलपे हे वारकरी (Warkari) संप्रदायातील आहेत. पंधरा दिवसांपूर्वी १६ डिसेंबर रोजी हरिनामाचा जप करत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला अन् ते जमिनीवर कोसळले. कुटुंबियांनी त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल केले. उपचार सुरू झाले, पण डॉक्टरांच्या प्रयत्नाला यश आले नाही. डॉक्टरांनी पांडुरंग उलपे यांचं निधन झाल्याचे कुटुंबियांना कळवले. उलपे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. घरी अंत्यविधीची तयारी सुरू झाली आणि अॅम्ब्युलन्समधून तात्यांना घरी घेऊन निघाले. पण त्याचवेळी कसबा बावडा येथेच रस्त्यात बसलेल्या धक्क्याने त्यांची पुन्हा हालचाल सुरू झाली. तेथूनच रुग्णवाहिका रुग्णालयाकडे पुन्हा माघारी फिरली.
पांडुरंग उलपे यांच्यावर रुग्णालयात १५ दिवस उपचार केल्यानंतर नव्या वर्षातच ते घरी परतले. एकाद्या चित्रपटाला लाजवेल अशी घटना कोल्हापूरमध्ये घडली. जणू काही देवांनी त्यांना परत पाठवले, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. पांडुरंग रामा उलपे. वयाच्या दहाव्या वर्षापासूनच ते वारकरी संप्रदायात आहेत. शेतमजूर म्हणून काम करताना आयुष्याच्या पासष्टीतही ते हरिनामात तल्लीन होतात. १६ डिसेंबर रोजी हरिनामाचा जप करताना हर्टअॅटक आला होता.
पांडुरंग उलपे हे नेहमीप्रमाणेच १६ डिसेंबर रोजी सायंकाळी हरिनामाचा जप होते. त्यावेळी अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले अन् ते जमिनीवर कोसळले. पत्नी बाळाबाई उलपे त्या ठिकाणी धावत आल्या, तेव्हा पांडुरंग उलपे घामाघूम झालेल्या अवस्थेत दिसले. त्यांनी शेजाऱ्यांना बोलावलं अन् तत्काळ दवाखान्यात दाखल केलं. चार पाच तास डॉक्टरांनी प्रयत्न केले, पण त्यानंतर पांडुरंग यांची प्राणज्योत मालवल्याचे जाहीर केले. काही मिनिटांतच ही बातमी कसबा बावड्यात पसरली. अंत्यविधीची तयाराही सुरू झाली. जवळचे पाहुणे, नातेवाईक, गावकरी घरी जमण्यास सुरूवात झाली. पांडुरंग उलपे यांचा मृतदेह घरी परत घेऊन येत होते, त्याचवेळी गतिरोधकवर रुग्णावाहिका जोरात आदळली. पांडुरंग यांच्या हालचाली सुरू झाल्याचं कुटुंबियांच्या निदर्शनास आले. रुग्णवाहिका पुन्हा एकदा रुग्णालयाकडे वळवली. त्यांच्यावर पुन्हा उपचार सुरू झाले. १५ दिवसानंतर पांडुरंग उलपे स्वतःच्या पायावर उभे राहिलेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.