Kolhapur Madhuri Elephant x
महाराष्ट्र

Kolhapur Madhuri Elephant : माधुरी हत्तीण पुन्हा कोल्हापुरात येणार? सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

Madhuri Elephant Case: कोल्हापूरच्या नांदणी मठातील माधुरी हत्तीला गुजरातमधील वनतारा संस्थेकडे हस्तांतरीत करण्यात आले होते. या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. या प्रकरणाची सुनावणी झाली आहे.

Yash Shirke

  • सुप्रीम कोर्टात माधुरी हत्तीण प्रकरणाची सुनावणी झाली.

  • नांदणी मठात परत आणण्याचा मार्ग काही प्रमाणात मोकळा.

  • अंतिम निर्णय हाय पॉवर कमिटी घेणार आहे.

Madhuri Elephant Kolhapur Vantara : कोल्हापूरमधील नांदणी गावातील माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीला गुजरातच्या जामनगरमधील वनतारा संस्थेकडे हस्तांतरित करण्याच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणाची सुनावणी झाली आहे. राजू शेट्टी यांनी सुनावणीसंबंधित माहिती दिली आहे. माधुरीला कोल्हापुरात परत आणण्याचा मार्ग काही प्रमाणात मोकळा झाल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

आज सुप्रीम कोर्टामध्ये माधुरी हत्तीणीला कोल्हापुरात, नांदणी मठात परत आणण्याच्या संदर्भातील पूर्वविचार याचिकेची सुनावणी झाली. राज्य सरकार, वनतारा आणि नांदणी मठाने संयुक्तपणे भूमिका मांडली की, नांदणी मठाने वनताराच्या देखरेखीखाली ७-८ एकर जमीन माधुरी हत्तीण आणि अन्य प्राण्यांसाठी उपलब्ध करुन घ्यावी. यावर महाराष्ट्र राज्य सरकार लक्ष ठेवून असेल, असे वक्तव्य राजू शेट्टी यांनी केले आहे.

राजू शेट्टी म्हणाले, 'सुप्रीम कोर्टाने माधुरी हत्तीणीला वनतारामध्ये पाठवण्याचा जो निर्णय देण्यात आला होता. तो बदलून हाय पॉवर कमिटीकडे जाण्याची परवानगी द्यावी आणि हाय पावर कमिटीच्या आदेशानुसार, माधुरी हत्तीणीला नांदणी मठात आणण्यासाठी प्रयत्न करावे यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने, हाय पॉवर कमिटीने सर्व परिस्थिती समजून घ्यावी आणि माधुरी हत्तीणीच्या आरोग्याची काळजी घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा. आता हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांचा अडथळा संपला आहे. आता सोमवारी राज्य सरकार, वनतारा आणि नांदणी मठ हे संयुक्तरित्या हाय पॉवर कमिटीकडे अर्ज करतील आणि एका प्रकारे माधुरी हत्तीणीला नांदणी मठात आणण्याचा मार्ग काही अंशी सुकर झाला आहे.'

माधुरी हत्तीण, नांदणी मठ, कोल्हापूर आणि वनतारा या प्रकरणातील सुनावणी आता सोमवारी (१५ सप्टेंबर) होणार आहे. या प्रकरणात हाय पॉवर कमिटी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT