Kolhapur Bank Manager Killed Over Bar Dispute Saam
महाराष्ट्र

दगड घालून डोक्याचा चेंदामेंदा अन्... कोल्हापुरात बँक मॅनेजरची निर्घृण हत्या, बार वेटरसोबत वाद घालणं भोवलं

Bank Manager Killed Over Bar Dispute: कोल्हापुरातील इचलकरंजीत भयंकर हत्येची घटना घडली. बार वेटरसोबत झालेल्या वादातून बँक मॅनेजरची निर्घृण हत्या करण्यात आली.

Bhagyashree Kamble

  • बँक व्यवस्थापकाची निर्घृण हत्या.

  • बार वेटरसोबत वाद घातल्यानं मॅनेजरला संपवलं.

  • कोल्हापुरातील इचलकरंजीतील कबनूर येथून घटना उघडकीस.

कोल्हापुरातील इचलकरंजीतील कबनूर येथून धक्कादायक बातमी समोर येत आहे. बँक व्यवस्थापकाची मुख्य मार्गावर निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बारमध्ये वेटरसोबत झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आली आहे. आरोपींनी बँक मॅनेजरच्या डोक्यात दगड घालून हत्या केली आहे. या हत्या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनंदन जयपाल कोल्हापुरे असे मृत बँक मॅनेजरचे नाव आहे. इचलकरंजीतील कबनूर येथील मुख्य मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास ही भीषण घटना घडली. बारमध्ये वेटरसोबक तरूणाचा वाद झाला. नंतर तरूणाला चौघांनी मुख्य मार्गावर गाठलं. तसेच बेदम मारहाण केली.

अभिनंदनच्या डोक्यात चौघांनी मिळून दगड घातला. तसेच सिमेंट पाइप घालून निर्घृण हत्या करण्यात आली. प्राथमिक तपासात वेटरसोबत झालेल्या वादातून अभिनंदनची हत्या करण्यात आली. आरोपींनी अभिनंदनला मुख्य मार्गावर सोडून पळ काढला. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

तसेच मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. या प्रकरणी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला. पंकज संजय चव्हाण, रोहित जगन्नाथ कोळेकर , विशाल राज लोंढे आणि आदित्य संजय पोवार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.  या खून प्रकरणातील चौघा आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासात अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू असून, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशनात मोठी घोषणा होणार; १८ विधेयके मांडली जाणार, लाडकी बहीण योजनेवरही फडणवीसांचं मोठं वक्तव्य

Bigg Boss 19: 'सलमान खानसोबत स्टेज शेअर करू नको...'; प्रसिद्ध अभिनेत्याला लॉरेन्स बिश्नोई गँग कडून धमकी

Bigg Boss 19 Grand Finale : शेवटच्या क्षणी बाजी पलटली; 'बिग बॉस १९'चा स्ट्राँग स्पर्धक घराबाहेर, नाव वाचून बसेल धक्का

कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार? ऑफिस वेळेनंतर नो कॉल-नो ईमेल

स्मृती-पलाशचं लग्न अखेर मोडलं, पुढे जाण्याची वेळ आली आहे

SCROLL FOR NEXT