Crime News Saam Digital
महाराष्ट्र

Kolhapur News: कोल्हापुरात टोळीयुद्धाचा भडका, तरुणावर अंदाधुंद गोळीबार; नागरिक धास्तावले

Kolhapur Firing News: कोल्हापूरच्या जवाहरनगर परिसरात गोळीबार झाला आहे. या गोळीबारात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.

Satish Daud

Kolhapur Breaking News

कोल्हापूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोल्हापूरच्या जवाहरनगर परिसरात गोळीबार झाला आहे. या गोळीबारात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रविवारी (ता. २१) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

साद शौकत मुजावर (वय २३) असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे.मागील काही दिवसांपासून कोल्हापुरात टोळी युद्धाचा भडका उडाला आहे. राजारामपुरी पोलिसांच्या दुर्लक्षामुळे परिसरात गँगवार सुरु असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पोलिसांनी तातडीने या गावगुंडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर शहरातील जवाहर नगर येथे रविवारी (ता. २१) रात्री पुन्हा गोळीबाराची घटना घडली. यात यादव कॉलनी येथील शौकत मुजावर (वय २३) हा युवक गंभीर रित्या जखमी झाला. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार मुजावर हा जेवण करून रात्रीच्या वेळी बाहेर फिरायला गेला होता.

त्याचवेळी चारचाकीमधून आलेल्या अज्ञात आरोपींनी त्याच्या दिशेने गोळीबार केला. यात दोन राऊंड हवेत उडाले, तर एक गोळी मुजावर याच्या मांडीत घुसली आहे. दरम्यान, गोळीबारानंतर आरोपींनी कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने मुजावरच्या डोक्यावर हल्ला केला. त्याने हा हल्ला चुकविण्याचा प्रयत्न केल्याने तो बचावला,

हा संपूर्ण प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिक येत असल्याचं पाहून हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला. या घटनेत मुजावर गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रत्नागिरी - चिपळूणमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महत्त्वपूर्ण बैठक

Indrayani : 'इंद्रायणी' मालिकेत नव्या पात्राची एन्ट्री; दिग्रसकरांच्या कुटुंबावर मोठे संकट, पाहा VIDEO

Pav Bhaji Recipe: मुंबई स्टाईल चमचमीत पावभाजी कशी बनवायची?

Ladki Bahin Yojana: ऑक्टोबर संपला, तरीही हप्ता आला नाही, लाडकीला ₹१५०० कधी मिळणार?

Gold- Silver Price: सोन्याला पुन्हा चकाकी! १० तोळे १२००० रुपयांनी महागले; २४-२२ कॅरेटचे आजचे दर किती?

SCROLL FOR NEXT