Proposed site for the upcoming IT Park in Kolhapur district. saam tv
महाराष्ट्र

Kolhapur IT Park: कोल्हापुरात होणार आयटीपार्क, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी

Kolhapur IT Park : कोल्हापूर आयटी पार्क प्रकल्पाला मोठी चालना मिळाली आहे. ज्यामुळे रोजगार आणि विकासाचे नवीन मार्ग खुले झाले आहेत. सरकारने जमिनीच्या उपलब्धतेला मंजुरी दिलीय.

Bharat Jadhav

  • जागेअभावी रखडलेला कोल्हापूर आयटी पार्क प्रकल्प पुन्हा मार्गी लागलाय.

  • आयटी पार्कसाठी आवश्यक जागा उपलब्धतेला शासनाची मंजुरी.

  • रोजगारनिर्मितीचे नवे दालन खुले होणार असल्याची शक्यता.

जागेअभावी कोल्हापूर शहरात होणाऱ्या आयटी पार्कला ब्रेक लागला होता. मात्र आता रोजगारनिर्मितीचा मार्ग मोकळा झालाय. मात्र आता ही अडचण दूर होण्याची शक्यता निर्माण झालीय. कोल्हापूर जिल्ह्यात आयटीपार्क स्थापनेसह आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावास शासनाने मंजुरी देण्यात आलीय. त्यामुळे आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.

क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कोल्हापूर जिल्ह्यात आयटीपार्कसाठी जागा उपलब्धतेच्या प्रस्तावास मंजुरी दिल्याची माहिती दिलीय. याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानलेत. शेंडा पार्क येथील आरोग्य व कृषी विभागाच्या जागा आयटीसह विविध शासकीय प्रयोजनांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव दीर्घकाळ प्रलंबित होता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.

शेंडा पार्क येथील आयटी पार्कसह इतर शासकीय उपयोगांसाठी आवश्यक जागा देण्यास शासनाने मंजुरी दिलीय. त्यामुळे आगामी काळात आयटीपार्कच्या माध्यमातून कोल्हापूरच्या विकासाचे संधी खुले होणार असल्याचा विश्वास आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रॅपिडो बाईक चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; कल्याणमध्ये खळबळ

Sunday Horoscope : लॉटरीमध्ये भरपूर पैसा मिळेल; ५ राशींच्या लोकांसाठी रविवार गेमचेंजर ठरणार

कर्नाटकात भाकरी फिरणार; शिवकुमार मुख्यमंत्री होणार, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

हाताने उखडला डांबरी रस्ता, ग्रामस्थांचा ठेकेदाराविरोधात संताप

कोल्हापुरी चप्पल जगभर पोहोचली; इटलीतील ग्राहकाने मोजले 51 हजार

SCROLL FOR NEXT