कोल्हापूरच्या जोतिबाची सासन काठी
अन् अंबाबाईची खणा नारळाची ओटी
ऊसाचा हिरवागार मळा
अन् सहकारानं लावलेला लळा
कुस्तीचा डाव अन् जगात भारी कोल्हापूरी चप्पल राव
सध्या 51 हजाराच्या कोल्हापूरी पायतानानं ईटलीच्या माणसावर जादू केलीय. पायात कोल्हापूरी पायतान असंल म्हणजी अंगावार मुठ मास अपसूक चढतंय... चालण्यात अन् वागण्यात रुबाब आला म्हणून समजा ह्यो इफेक्टच कोल्हापुरीचा...
ह्योच इफेक्ट ईटलीच्या एका माणसावर झाला. अन् गाठलं कोल्हापूरच्या राजेंद्र शिंदेंना अन् दिली ऑर्डर पण एका अटीवर ऐका नेमकी अट हाय तरी काय ठरलं अट झाली मान्य. कोल्हापूरचा वाघ लागला कामाला... अन् साकारली कोल्हापूर चप्पल ती बी एकदाम दर्जा...पायतान तर झालं. पण दर काय ठरना. जानकारांसोबत चर्चा केली अन् ठरला दर 51 हजार....
प्राडा सारख्या कंपनीला कोल्हापुरच्या वस्तादांनी दाखवलंय अस्मान...
कोल्हापूरची माणसं तशी गुळासारखी गुळमाट पण वाकड्यात गेल्यावर कार्यक्रम केला म्हणूनच समजा.. कोल्हापुरी पायतान खायचं का घालायचं ही ज्याच्या त्याच्या . असू द्या...
माग सरु नकू इटलीच्या मर्दा पायात घाल कोल्हापूरी पायतान दर्जा
कोल्हापूरवरनं रणजीत माझगावकर, साम टीव्ही
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.