Kolhapur Hupari Transgender corporator Saam TV
महाराष्ट्र

कोल्हापुरकरांनी बदल घडवला; हुपरी नगरपरिषदेत तृतीयपंथी स्वीकृत नगरसेवक

ताराराणी आघाडीने हांडे यांना हा बहुमान दिला आहे.

संभाजी थोरात

कोल्हापूर : संपूर्ण राज्याला आदर्श घालून देणारी घटना कोल्हापूर (kolhapur) जिल्ह्यातल्या हुपरी नगरपरिषदेत घडली आहे. कारण हुपरी येथील नगरपरिषदेनं एका तृतीयपंथीला स्वीकृत नगरसेवक (Corporator) बनवलं आहे. तातोबा हांडे असं या तृतीतयपंथी नगरसेवकाचं नाव आहे. आज पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सत्ताधारी ताराराणी आघाडीने हांडे यांना हा बहुमान दिला आहे. (Kolhapur Hupari Transgender Nominated Corporator)

बहुमत असेल तर या राज्याचा मुख्यमंत्री तृतीयपंथी सुद्धा होऊ शकतो. असं वक्तव्य विधानसभेचे विरोधीपक्षनते अजित पवार यांनी काय दिवसांपूर्वी केलं होतं. आजरपर्यंत प्रत्यक्षात राजकारणात असे चित्र आजपर्यंत पाहायला मिळाले नाही.राजकारणामध्ये नेहमीच तृतीयपंथी यांना संघर्ष करावा लागला आहे.

मात्र आज हुपरी नगरपरिषदेनं तृतीयपंथीची निवड करून संपूर्ण राज्यातील राजकारणाला आदर्श घालून दिला आहे. तातोबा हांडे हुपरीतील अनेक सामाजिक उपक्रमात अग्रेसर असतात. तृतीयपंथीयांच्या अनेक प्रश्नावर लढा देतात.

त्यामुळे हुपरी नगरपालिकेच्या निवडणुकीत त्याना ताराराणी आघाडीच्या वतीने उतरवण्यात येणार होत मात्र तांत्रिक अडचणीमुळे त्याना निवडणूक लढता आली नाही.

त्यामुळे ताराराणी आघाडीचे नेते राहुल आवाडे यांनी त्याना स्वीकृत नगरसेवक म्हणून घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान आवाडे यांच्या या निर्णययाचे हुपरीकरांनीही स्वागत केलं. या निवडीमुळे तृतीयपंथीयामध्ये आनंदाच वातावरण आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मंत्री पंकजा मुंडे उद्या राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मूर्ती वरती हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करणार

Bigg Boss 19: कमी मतं नाहीतर कुटुंब कारण ठरलं? अवेज दरबार बिग बॉस १९ च्या घराबाहेर पडण्याचं वेगळंच गुपित समोर आलं

Liver Damage Causes: दारू न पिताही लिव्हर खराब करतात 'या' सवयी; वेळीच व्हा सावध

Nilesh Ghaywal: निलेश घायवळचं लंडन पलायन, पासपोर्ट प्रकरणावर चंद्रकांत पाटलांची चुप्पी, धंगेकरांना वेगळीच शंका

Uddhav Thackeray : शेतकरी भाजपमध्ये आले तर कर्जमाफी? दसरा मेळाव्याआधी उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना टोला

SCROLL FOR NEXT