चंदीगढ : प्रेमासाठी माणूस वाट्टेल ते करतो. जोपर्यंत प्रेमात होकार मिळत नाही तोपर्यंत प्रेम करणाऱ्याला व्यक्तीला काही चैन पडत नाही. मात्र कधी-कधी समोरच्या व्यक्तीचा नकार असताना देखील तिला सातत्याने प्रेमाची गळ घालणं अंगलट येतं. असाच काहीसा एक प्रकार पंजाबमधील चंदीगढ शहरातून समोर आला आहे. (Chandigarh Latest News)
येथील एका तरुणाची सोशल मीडियावर एका विवाहित महिलेसोबत ओळख झाली. दोघांमध्ये संभाषणही झालं. मात्र, त्यानंतर या तरुणाने विवाहितेला प्रेमाची गळ घातली. त्यावेळी संबधित महिलेने विवाहित असल्याने नकार दिला. मात्र, नकार देऊनही या तरुणाने तिला सातत्याने I Like u असे मॅसेज पाठवले. सातत्याने येत असलेल्या मॅसेजला कंटाळून या विवाहितेने अखेर या तरुणाची तक्रार आपल्या पतीकडे केली.
पत्नीला वारंवार मॅसेज केल्याचा राग मनात धरून पतीने या तरुणाची चांगलीच धुलाई केली. दरम्यान, महिलेच्या पतीने केलेल्या मारहाणीबाबत प्रेमवीराने ट्विट करून पोलिसांकडे तक्रार केली आहे. माफी मागून सुद्धा महिलेच्या पतीने आपल्याला मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे आता या प्रेमवीराने पोलिसांत संरक्षण मागितले आहे. (Panjab Police News)
सुशांत दत्त असे या प्रेमवीचे नाव आहे. त्याने पंजाब पोलिसांना टॅग करत ट्विट केले, त्यात त्याने लिहिले. ‘सर, मी एखाद्याला ‘आय लाइक यू’ मेसेज पाठवला आहे. काल रात्री तिच्या पतीने मला बेदम मारहाण केली. मी पुन्हा पुन्हा माफी मागत राहिलो. पण आता मला माझ्या सुरक्षिततेची काळजी वाटत आहे. कृपया मला मदत करा आणि माझे जीवन वाचवा. माझ्यावर पुन्हा हल्ला होऊ शकतो, असे प्रेमवीर सुशांत दत्तने म्हटले आहे.
दरम्यान, सुरेश दत्तचे हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले. त्यानंतर पोलिसांनी देखील त्याच्या ट्विटचा समाचार घेतला. एका अनोळखी महिलेला अनपेक्षित मेसेज पाठवून तुम्हाला त्या बदल्यात काय अपेक्षित होते? हे आम्हाला ठाऊक नाही. पण त्या महिलेच्या पतीने तुम्हाला मारहाण करायला नको होती. आपण तेव्हाच जर तक्रार केली असती, तर आम्ही कायदेशीर कलमांतर्गत महिलेच्या पतीला शिक्षा केली असती. तूर्तास या दोन्ही गुन्ह्यांबाबत कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी ट्विटरवरून दिले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.