Kolhapur Flood Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur Flood: हातातून दोर निसटला अन् पुराच्या पाण्यात पडला; धडकी भरवणारा १० सेकंदाचा VIDEO

Kolhapur Flood Video: कोल्हापूरमध्ये पुराच्या पाण्यामध्ये तरुण वाहून गेला. या तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला गेला पण हातातून दोर सुटला आणि हा तरूण पूरात वाहून गेला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलं. या पावसामुळे जिल्ह्यातील ओढ्या, नाल्यांना पूर आला. गोकुळ शिरगाव इथल्या पुराच्या पाण्यात एक तरुण वाहून चालला होता. या तरुणाला गावातील काही तरुणांनी दोरीच्या सहाय्याने वाचवण्याचा प्रयत्न केला. तरुणाने दोरीचा आधार घेऊन पुलावर येण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा हात निटसला आणि तो पूराच्या पाण्यात वाहून गेला. या घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारनंतर कोल्हापूर जिल्ह्यासह शहराला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना थोडासा दिलासा मिळाला खरा पण अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने नागरिकांची दाणादाण उडाली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी आल्याने अनेक नागरिकांना आपली वाहनं या पाण्याच्या प्रवाहातून ढकलत बाहेर काढावी लागले.

या पावसामुळे सखल भागात पाणीच पाणी झाल्याने अनेक चारचाकी वाहनं देखील यामध्ये अडकली होती. कोल्हापूर शहरातील रस्ते आणि नाले हे पूर्णपणे जलमय झाले होते. कोल्हापुरात आता जरी पाऊस थांबला असला तरी कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाचे अनेक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. यामध्ये एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये पूरामध्ये वाहून जाणाऱ्या तरुणाला गावकऱ्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. पण हातातून दोर सुटल्यामुळे हा तरूण पुरात वाहून केला.

दरम्यान, कोल्हापूर जिल्हासह शहरात पडलेल्या अति मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातील उपनगर आणि अनेक झोपडपट्ट्यांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. यामुळे अनेक घरांसह प्रापंचिक साहित्यांचे नुकसान झालं आहे. शास्त्रीनगर रेसिडेन्सी कॉलनी इथल्या सुभाष आप्पासाहेब घाडगे आणि शुभांगी सुभाष गाडगे यांच्या घरामध्ये ओढ्याचे पाणी शिरले होते. त्यांचे रेस्क्यू करून सुखरूप बाहेर काढण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pratapgad Fort History: ऐतिहासिक शौर्य, भव्य वास्तुकला असलेले प्रतापगड; जाणून घ्या इतिहास आणि वैशिष्ट्ये

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नव्या बसांना हिरवा झेंडा

माजी पंतप्रधानांच्या बहिणीवर महिलांचा हल्ला, भर पत्रकार परिषदेत अंडी फेकली, नेमकं कारण काय?

आताच तिकिट बुक करा! दिवळीआधी रेल्वेचं मोठं गिफ्ट, तब्बल ९४४ विशेष गाड्या धावणार, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT