hasan mushrif 
महाराष्ट्र

'महाडिक, पाटील, कोरेंसह मी बँकेच्या पैशाचा लाभ घेतलेला नाही'

Siddharth Latkar

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर होईल. आमच्या आघाडीच्या विजयाचे महाद्वार कागलमधून उघडणार असा विश्वास ग्रामविकास मंत्री व बॅंकेचे संचालक हसन मुश्रीफ यांनी कागल येथील सभासदांच्या मेळाव्यात व्यक्त केला. शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून बँकेचा कारभार सातत्याने राजकारण विरहित केल्याचे मुश्रीफ यांनी नमूद केले. kolhapur-district-cooperative-bank-election-kagal-hasan-mushrif-sml80

प्रारंभी मुश्रीफ यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचार सुरू असतानाही दवाखान्यातून थेट मेळाव्यात आलेल्या खासदार मंडलिक व माजी आमदार श्री.घाटगे यांचे आभार मानले. ते म्हणाले तालुक्यात एकूण ८३७ ठरावधारक आहेत. त्यापैकी ८०० महाविकास आघाडीचे आहेत.

प्रशासकाची सत्ता जाऊन सहा वर्षांपूर्वी बँकेचा कारभार हाती घेतला. त्यावेळी १३७ कोटी संचित तोटा होता. थकित कर्ज वसुलीचे फार मोठे आव्हान समोर होते. तशाही परिस्थितीत वसुलीसाठी हलगी, ताशा, सनई, चौघडा घेऊन प्रसंगी मित्रमंडळींच्या सुद्धा दारात गेलो. बँकेचे मालक म्हणून नव्हे तर विश्वस्त म्हणून कामकाज केले. बँकेचे वाहन, नाश्ता, जेवण, हॉटेल भाडे, प्रवास भाडे या कोणत्याही सुविधा घेतल्या नाहीत असेही मुश्रीफ यांनी नमूद केले.

ते म्हणाले माझ्यासह संचालक मंडळातील माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार पी.एन.पाटील, आमदार विनय कोरे यांच्यासह कुणीही या बँकेचा पाच पैशाचासुद्धा लाभ घेतलेला नाही हे अभिमानाने सांगेन. बँकेचा मालक असलेल्या शेतकर्‍यांसह, कर्मचारी, पगारदार, नोकरदार व गटसचिवांनाही विमासुरक्षा लागू केल्याचे त्यांनी नमूद केले.

महाविकास आघाडीच्या माध्यमातून खासदार संजय मंडलिक यांना पुन्हा खासदार करूया असे आवाहन ही मुश्रीफ यांनी केले. ते म्हणाले माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्यावर नियतीनेच सातत्याने अन्याय केला आहे.त्यांनाही योग्य तो मान सन्मान मिळावा अशी भावना मुश्रीफांनी व्यक्त केली. ते म्हणाले (कै.) खासदार सदाशिवराव मंडलिक भाषणात नेहमी म्हणायचे मी उरलो आता उपकारापुरता. माझे व संजयबाबा घाडगे यांचेही वय आता सत्तरीच्या घरात आहे. जय-पराजय, निवडणुका, लढाया हे सगळं आता झाले. वैर -मतभेद कुणाशी धरायचे ? त्यामुळे संत तुकारामांच्या अभंगाप्रमाणे आता मी उरलो विकासकामे आणि जनसेवेच्या उपकारापुरता असे मुश्रीफांनी म्हणताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT