illegal pregnancy test racket busted in kolhapur saam tv
महाराष्ट्र

Kolhapur Crime News : अवैध गर्भलिंग निदान प्रकरणी तिघांना अटक, सोनोग्राफी मशीन जप्त

यापूर्वीच पाेलिसांनी सोनोग्राफी मशीनसह अन्य साहित्य जप्त केले आहे.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News :

कोल्हापुरातील वाशी नाका परिसरात बेकायदेशीर लिंग निदान छाप्यात आणखी तीन एजंटना पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली आहे. प्रदीप बाजीराव कोळी, पंकज नारायण बारटक्के आणि निखिल रघुनाथ पाटील अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. (Maharashtra News)

या तिन्ही एजंटने गर्भलिंग निदानासाठी प्रत्येकी दोन ते तीन ग्राहक शोधून बनावट डॉक्टर सुनील पाटील यांच्यापर्यंत पोहोचवल्याचं तपासात स्पष्ट झालेले आहे. आरोग्य विभाग आणि करवीर पोलिसांनी 16 जानेवारीला सायंकाळी काेल्हापूरच्या नवीन वाशी नाका इथल्या सुलोचना पार्क इथं म्हाडा कॉलनीत छापा टाकून सोनोग्राफी मशीनसह अन्य साहित्य जप्त केले आहे.

मुलगा होण्याचं औषध देण्याचा दावा सोशल मीडियावर करून बेकायदा गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्यांवर पोलिसांनी छापा टाकला होता. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बनावट डॉक्टर सुनील केरबा पाटील याचा यापूर्वीही राधानगरी आणि मुरगुड इथल्या छाप्यातील सहभाग असल्याचं पोलिसांच्या तपासात स्पष्ट झालेला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : डॉ.गौरी पालवे यांच्यावर अनंत गर्जे यांच्या घराशेजारीच पार पडले अंत्यसंस्कार...

Raigad Garam Pani Kund History: निसर्गाचा चमत्कार लाभलेल्या रायगड जिल्ह्यात 'गरम पाण्याचे कुंड' कुठे आहे?

Dombivli : धक्कादायक! फोन करून घरी बोलावलं, काळंनिळं होईपर्यंत मारलं, सराफाला डांबून ठेवून लूट; आरोपी फरार

Ladki Bahin Yojana: उरले शेवटचे ६ दिवस!लाडक्या बहि‍णींना नोव्हेंबरचे ₹१५०० कधी मिळणार? वाचा सविस्तर

Masti 4 OTT : कॉमेडीचा Triple धमाका! रितेश-विवेक-आफताबचे त्रिकूट ओटीटीवर कुठे अन् कधी पाहता येणार?

SCROLL FOR NEXT