Kolhapur Crime Saam tv
महाराष्ट्र

Kolhapur Crime : साथीदारांसोबत नोकराने आखला चोरीचा प्लॅन; पावणेदोन कोटी रुपये चोरणारी टोळी ताब्यात

Kolhapur News : गुडलक स्टेशनरीचे व्यापारी प्रकाश वादवाणी यांच्याकडे स्वरूप शेळके हा नोकरी करत होता. त्याला कैलास गोरड याचे आर्थिक व्यवहार आणि रोख रक्कम कोठे ठेवतात याबाबतची माहिती होती

Rajesh Sonwane

रणजित माजगावकर 

कोल्हापूर : कोल्हापुरातील गांधीनगर मधील व्यापाऱ्याचे टेम्पोमध्ये ठेवलेली रक्कम चोरून नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसात दाखल तक्रारीनंतर पोलिसांनी तपास केला असून पैसे चोरणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. यात चौघांचा समावेश असून टोळीकडून चोरीच्या रक्कमेसह मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

कोल्हापूरच्या गांधीनगरमध्ये राहणाऱ्या व्यापारी प्रकाश  वादवाणी यांनी कंपाउंडमध्ये पार्क केलेल्या टेम्पोच्या डॅश बोर्डमध्ये ठेवलेले पैसे १३ जूनला मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. दरम्यान कोल्हापुरातील गुडलक स्टेशनरीचे व्यापारी प्रकाश वादवाणी यांच्याकडे स्वरूप शेळके हा नोकरी करत होता. त्याला कैलास गोरड याचे आर्थिक व्यवहार आणि रोख रक्कम कोठे ठेवतात याबाबतची माहिती होती.

प्लॅन आखत चोरले पावणे दोन कोटी 

त्याने ही माहिती योगेश पडळकर, स्वयंम सावंत, सम्राट शेळकेसह आणखीन एक अल्पवयीन साथीदार यांना दिली. यानंतर सर्वांनी पैसे चोरण्याचा प्लॅन केला. प्लॅननुसार १३ जूनच्या मध्यरात्री सर्वांनी गुडलक स्टेशनरीच्या कंपाउंडजवळ उभ्या असणाऱ्या टेम्पोच्या काचा फोडून डॅशबोर्ड जवळील कप्प्यात ठेवलेली रोख रक्कमेची पिशवी चोरून नेली होती. याबाबत बेळगाव जिल्ह्यातील शहापूर येथे राहणारे कैलास गोरड यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. 

पोलिसांनी सापळा रचत घेतले ताब्यात 

यानंतर पोलीस तपासात कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहत इथे राहणाऱ्या योगेश पडळकर आणि त्याच्या साथीदारांनी ही चोरी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून योगेश पडळकर आणि इतर साथीदारांना ताब्यात घेतले. तसेच चोरीचे १ कोटी ७८ लाख रुपये रोख रक्कमेसह दोन दुचाकी आणि मोबाईल असा १ कोटी ७९ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pik Vima Yojana: शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी! या तारखेपर्यंत फळपीक विमा योजनेसाठी करु शकता अर्ज; वाचा सविस्तर

APMC मार्केटमधून ड्रायफ्रूट्स खरेदी करताय तर थांबा, भेसळयुक्त काजू- बदाम अन् मनुक्यांची विक्री; धक्कादायक VIDEO समोर

Box Office Collection: 'कांतारा: चॅप्टर १' ची बॉक्स ऑफिसवर तुफान क्रेझ; ५०० कोटींच्या क्लबमध्ये लवकरच करणार एन्ट्री

Pune News : पुणेकरांनो सावधान! भेसळयुक्त खवा-मावा, तूप अन् तेलाची विक्री, २ कोटींचा साठा जप्त

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना भाऊबीजेची ओवाळणी मिळणार? ऑक्टोबरचे ₹१५०० जमा होणार

SCROLL FOR NEXT